Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
केंद्र शासनाच्याकडे असलेल्या सर्किट हाउस नजीक असलेल्या ईएसआय हॉस्पीटलमध्ये लवकरच 100 बेडची व्यवस्थ करण्यात येणार आहे. सध्या 30 बेडची व्यवस्था आहे. याबाबतची हॉस्पीटल डेव्हलपमेंट कमिटीची पहिली सभा आज संपन्न झाली. यामध्ये झालेली चर्चा व ठरलेल्या बाबी खालील प्रमाणे आहेत.
सभेपुर्वी सर्व कमिटी सदस्यांनी हॉस्पीटलच्या अंतर्गत होत असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष जागेवर जावून पहाणी केली, यावेळी वैद्यकिय अधिक्षक अनुजा बेलोसे व डॉ.रविंद्र पवार यांनी माहिती दिली व त्यानंतर सभागृहात झालेल्याची चर्चा खालील प्रमाणे आहे.
सभेच्या सुरवातील डॉ.पवार यांनी पीपीटी व्दारे हॉस्पीटलच फोटो व माहिती दिली. ईएसआय ला नुकतीच 75 वर्षे पुर्ण झाली. सन 1948 साली ईएसआयसी हा कायदा आला. सन 1951 साली याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. केंद्र शासनाने हे हॉस्पीटल राज्य शासनाकडे चालविण्यासाठी दिले होते परंतु सन 2017 साली पुन्हा केंद्र शासनाकडे वर्ग करण्यात आले. हॉस्पीटलसाठी 9 एकर जागा असून यामध्ये 10,000 चौरस फुटामध्ये बांधकाम केले आहे. सन 1998 साठी या हॉस्पीटलचे बांधकाम झाले परंतु सन 2018 मध्ये प्रत्यक्ष ओपीडीला सुरवात झाली. सध्या सरासरी 400 ते 500 रूग्न या हॉस्पीटलची सेवा दररोज घेत आहेत. या हॉस्पीटलमध्ये रक्त,लघवी व इतर तपासणी करून रिपोर्ट दिले जातात यासाठी स्वतंत्र लॅबोरेटरी आहे. भविष्यात हॉस्पीटलमधील वेस्ट रिसाकलींग प्लॅण्ट उभा करणार आहेत. हॉस्पीटल पहाणी मध्ये मुख्य ऑपरेशन थिएटर, मायनर ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन प्लॅण्ट ची सोय करणे, आयसीयू, जनरल वॉर्ड, मेडिकल स्टोअर रूम, एक्सरे रूम इ. लहान मुलांचे आयसीयू रूमची कामे सुरू आहेत.
दंत तपासणीसाठी दोन चेअर्स, योगा सर्व्हीस, औषधे, रूग्नांना दिले जातात, व्हेंटीलेटर्सची सोय सुध्दा येथे उपलब्ध आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होते, यासाठी ई ऑफिस ही संकल्पना राबविली आहे. यानंतर हॉस्पीटल डेव्हलपमेंटसाठी निधीची कमतरता नाही परंतु आपल्या मागण्या प्रादेशिक कार्यालयाला कमिटीच्या मंजूरी प्रस्ताव पाठवावे लागतात. सन 2018-19 मध्ये 18 कोटीचे बजेट होते चालू वर्षी म्हणजे सन 2025-26 साली 36 कोटी रूपयांचे होते व पुढील वर्ष सन 2026-27 साठी 42 कोटी रूपयांचे बजेट आहे. यामध्ये मेडिकल साहित्य, स्टाफ पगार व इतर सोईंचा समावेश आहे. या हॉस्पीटलव्दारे कोल्हापूर,सांगली,सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्हयातील रूग्नांना सेवा दिली जाते.
मेडीकल साहित्यासाठी रू.5.62 कोटी, औषधे व डे्सिंगसाठी रू.4.60 कोटी इ.ची तरतूद केली आहे.
या हॉस्पीटलमध्ये एमआरआय आणि सीटी स्कॅनची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात इंजिनिअरिंग असोसिएशन तर्फे करण्यात आली. परंतु 100 बेड या निकषात बसत नसल्याने पीपीपी प्रायव्हेट पब्लीक पार्टनरशिप सर्व्हीसेसव्दारे ही सेवा उपलब्ध करावी किंवा पीजी कॉलेज सुरू करणे असेही पर्याय देण्यात आले. जीबी सिंड्ोम सारख्या आजाराव उपचार मिळणेसाठी 90 दिवसांची अट काढून टाकावी, तसेच बेडची संख्या वाढवून येथे मेडिकल कॉले सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही मागणी करण्यात आली.
सहा.कामगार आयुक्त श्री.विशाल घोडके यांनी या कमिटीचे अधिकारी, त्यांचे आयडेंटी द्या, टायप हॉस्पीटलची यादी, तसेच रूग्नांचा वेळ वाचविण्यासाठी किंवा गैरसोय टाळण्यासाठी उपाय करावे अशी मागणी केली. तसेच येणा-या रूग्नांना योग्य वेळेत सेवा मिळणेसाठी एक कौन्सीलर ठेवावा अशी सूचना केली. त्याच बरोबर ईएसआय हॉस्पीटलने सुरू केलेले AAA याबाबतची माहिती फारशी कोणाला नाही, याबाबत जनजागृती मोठया प्रमाणावर करा अशीही सूचना केली.
इचलकरंजीचे नगरसेवक श्री.रणजीत पाटील खासदार श्री.धैर्यशिल माने यांचे प्रतिनिधी यांनी आजी आजोबांनाही उपचार मिळावेत अशी मागणी केली, रूग्नांची तक्रार येवू नयेत, सर्व सेवा त्यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी हॉस्पीटलच्या स्टाफने काम करावे अशी सूचना केली हॉस्पीटलमध्ये तक्रार बुक ठेवा. कंत्राटदारांनी वेळेवर कामे करावीत अन्यथा एनओसी मिळणार नाही, दि.31 मार्च पुर्वी सर्व कामे पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या तसेच विकासात्क कामे होत असताना सर्व कामाचे ऑडिट करा, दुरूस्ती सुरू आहे परंतु खरमातीमुळे स्वच्छता नाही ती स्वच्छता करून घ्या. अश्याही सूचना त्यांनी दिल्या. तसेच दि.1 मे कामगार व महाराष्ट् दिनानिमित्त याचे उद्घटन करण्याचे नियोजन करण्याचे ठरले तसेच पुढील सभा दि.25 मार्च 2026 रोजी आयोजित करण्याचे ठरले.
सभेपुर्वी दिपप्रज्वलन करून व कमिटी सदस्यांची पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी सर्व श्री. सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके, कोल्हापूर इंजि.असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, इचलकरंजीचे नगरसेवक रणजीत पाटील, कामगार युनियन प्रतिनिधी प्रकाश कांबरे, इंडो काउंट तर्फे राजेश मोहिते, प्रदीप व्हरांबळे,ईएसआयसीचे माजी कर्मचारी मुल्ला, सहयोगी स्टाफ, कॉन्ट्क्टर इ.उपस्थित होते.
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur