फौंड्ीतज्ञ उद्योजिका श्रीमती नलिनी नेने लिखित एस.जी.आयर्न हे मराठी भाषेतील पहिले पुस्तक. या पुस्तकाचे प्रकाशन महापौर रूपराणी निकम यांच्याहस्ते संपन्न झाले. या पुस्तकात कच्च्या मालापासून ते कास्टिंग तयार करण्यापर्यंतची सर्व माहिती या पुस्तकात मराठीभाषेत प्रसिध्द करण्यात आली आहे. यावेळी त्याम्हणाल्या कोल्हापूरचा कायापालट करण्याची इच्छा आहे. ड वर्गातून अ वर्ग महानगरपालिका करावयाची आहे. स्वच्छ सुंदर कोल्हापूर शहर करण्यासाठी उद्योजकांनी साथ द्यावी. कोल्हापूरची वैशिष्टये जशी नाकातील नथ, कोल्हापूरी चप्पल,गुळ इ.प्रवेशव्दारावरती सुशोभित करून कोल्हापूरची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. माहे शहर माझी जबाबदारी यानुसार पर्यटकांना आर्कषीत करेल असे कोल्हापूर करण्याचा मानस आहे. नेने मॅडमयांनी वयाच्या 81 व्या वर्षी हे पुस्तक लिहीले त्यांचा उत्साह व उद्योजक,सुपरवायझर,कामगार यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात सहजता मिळावी, कामे कमी वेळेत व अचूक होण्यासाठी हया पुस्तकाचा उपयोग नक्कीच होईल त्यांच्या या कार्यस त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यकमाचे अध्यक्ष किरण पाटील यांनी एस.जी.आयर्नची सुरवात ज्यांनी केली त्यांची माहिती दिली, तसेच फादर ऑफ एस.जी.आयर्न डॉ. क्लाउस र्होनुंग जे स्वित्झरलंडमधील जॉर्ज फिशर कंपनीत रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट विभागात काम करत होते त्यांचा उल्लेख केला, त्यानंतर अनेक बदल फौंड्ी उद्योगात झाले असून गेल्या सात-आठ वर्षापासून इनमोल्ड तंत्रज्ञानाचा वापरकरून वेगवान फौंड्ी उत्पादने घेत आहोत आणि या तंत्रज्ञान पहाण्यासाठी नक्कीच त्यांच्या उद्योगाला भेट द्यावी अशी विनंती त्यांनी केली. पुस्तक प्रसिध्द करताना तसेच मराठी भाषेतील तांत्रिक शब्दांची माहिती व मनोगत नितीन वाडीकर यांनी करून दिली. लेखिका नेने मॅडम यांनी मनोगतामध्ये सांगितले की, मागील पुस्तकातून हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशला विनंती केली असोसिएशन तर्फे हे पुस्तक प्रकाशित करावे आणि त्यांनी साथ दिली याबद्दल आभार व्यक्त केले. पुस्तक प्रकाशित करण्यामध्ये महत्वाची भूमिका पारपाडल्याबद्दल उद्यमवार्ताचे मुख्यसंपादक नितीन वाडीकर व पीआरओ प्रशांत मोरे यांचा अनुक्रमे महापौर निकम आणि कार्यकमाचे अध्यक्ष किरण पाटील यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. पुस्तकाबद्दलची माहिती व प्रास्ताविक अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी केले प्रास्ताविकात संस्थेच्या गेल्या 79 वर्षात अनेक दिग्गज व नामंवत उद्योजकांनी भेटी दिल्याचे सांगितले, त्याच बरोबर असोसिएशनचे कार्य व ओळखही करून दिली. त्याचबरोबर असोसिएशनने यापुर्वी उद्योजकांची माहिती असलेली डिरेक्टरी प्रसिध्द करून उद्योजकांना मार्गदर्शन केले असून आता यापुस्तक रूपाने उद्योजकांना,सुपरवायझरना व कर्मचा-यांना एस.जी.आयर्नची माहीती होण्यासाठी हे पुस्तक असोसिएशन तर्फे प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नेने मॅडम यांनी पुर्वी लिहीलेल्या पुस्तकाचा त्यांना दैनंदिन औद्योगिक उत्पादने करताना झाला असेही ते म्हणाले. प्रमुख पाहुण्या महापौर रूपाराणी निकम आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण पाटील यांची ओळख उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांनी करून दिली. आभार प्रदर्शन टे्झरर प्रसन्न तेरदाळकर यांनी केले. सूत्रसंचालन सेक्रेटरी प्रदीप व्हरांबळे यांनी केले. यावेळी सर्व कुशल सामाणी, संजय अंगडी, नितीन वाडीकर, सचिन मेनन, बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, अभिषेक सावेकर, जयदिप मांगोरे, भरत जाधव, मोहन कुशिरे, राहूल पाटील, सतिश कडूकर,प्रकाश राठोड, शाम तोतला,सुधाकर सुतार,किरण वसा, राजेंद्र जोशी, प्रदीपभाई कापडिया, संजय पेंडसे, बाबुभाई हुदली, प्रभाकर तांबट, मिलींद बिरादार, संदीप मांगोरे, डॉ.ए.एम.गुरव, हिंदूराव कामते, अशोक जाधव, सुरेश मंडलिक, श्रीरंग देशिंगकर, शांताराम सुर्वे, संजय पाटील, संगिता नलवडे, विजय कामते,दैनिक केसरी व ऐक्यचे माजी कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार वासूदेव कुलकर्णी, मुबारक शेख, साधना देशिंगकर, सिमा सुतार, सागर जाधव, विशाल मंडलिक, राहूल कांबळे, रूपा रायचूर, मिथ्थन निवास, अभिजित नाईक, अनिल महाडिक, एस.व्ही.नेने, मिलींद नाईक संगिता बुधले, भालचंद्र पाटील, स्वप्नील सासणे, अंकित चौगले, सचिन पाटील, शिल्पा मोरे, प्रशांत मोरे, राम कंुभार, भगवान माने इ.उपस्थित होते.

Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur