????कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाचे आयुक्त श्री.मनिष हळदोणे यांनी आज कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनला भेट दिली. केंद्र शासनाने कर्मचा-यांच्या सामाजिक सुरक्षा कवच अंतर्गत कर्मचारी नोंदणी विशेष मोहिम आयोजित केली होती, ती यशस्वीरित्या संपन्न झाली. या मोहिमेबाबत प्रतिक्रीया जाणून घेणे, यामध्ये आणखिन कांही सुधारणा बाबत चर्चा झाली. तसेच नवीन लेबर कोड अंतर्गत पीएफ लिमिट वाढण्याची शक्यता यावेळी त्यांनी व्यक्त केली. कर्मचा-यांचा पीएफ आपण भरतो असे न म्हणता आपण त्यांना पेन्शन देतो असे म्हटलेतर जास्त योग्य होईल असे ते म्हणाले. पीएफ संदर्भात उद्योजकांच्या कांही शंका,प्रश्न किंवा कांही समस्या असतीत तर पीएफ ऑफिस मध्ये दर दोन महिन्याला सभा आयोजित केली जाते, या सभेत तुम्ही सहभागी होवून तुमचे प्रश्न मांडू शकता. कर्मचा-याच्या अचानक मृत्यू नंतर त्यांच्या पत्नीलाही पेन्शन मिळते. सध्या पाच जिल्हयाचा विचार केल्यास 1,85,000 पेन्शनर्स आहेत. सध्या किमान पेन्शन रू.1000/- इतकी असून ती वाढून रू.3000/- होण्याची शक्यताही त्यांनी सांगितली. कंपनीचे डायरेक्टरही पीएफचा लाभ घेवू शकतात. पीएफ मध्ये वेळोवेळी होणारे बदल व माहिती कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन कळविली जाईल असे आयुक्त श्री.मनिष हळदोणे हे म्हणाले. या कार्यालयाचे कामकाज संपूर्णपणे ऑनलाईन झाले असून कागदपत्रे देण्यासाठी तुम्हाला या कार्यालयात यावे लागत नाही. या कार्यालयाचा एकच ईमेल आयडी ro.kolhapur@epfindia.gov.in असून सर्व प्रकारचा पत्रव्यवहार यावरतीच करावा असे त्यांनी आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली तसेच इतर माहितीही त्यांनी दिली. अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्याहस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रवर्तन अधिकारी श्रेयस पाल, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, टे्झरर प्रसन्न तेरदाळकर,संचालक बाबासो कोंडेकर,कुशल सामाणी, संजय पेंडसे, रोहीत शिंदे,प्रदीप व्हरांबळे इ.उपस्थित होते.

Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur