????कोल्हापूरचे नूतन पोलिस अधिक्षक श्री.निलोत्पल यांची कोल्हापूर फर्स्ट व कोल्हापूर इंजिनीरिंग असोसिएशन पदाधिका-यांनी भेट घेवून पदभार स्विकारलेबद्दल पुष्पगुच्छ देवून स्वागत आणि अभिनंद करण्यात आहे. यावेळी चेअरमन श्री.सुरेन्द्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्टच्या कार्याची माहिती दिली. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी आपल्या कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन व येथील प्रसिध्द असलेल्या फौंड्रि उद्योगाची माहिती दिली. नूतन एसपी हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. त्यांना कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनला भेट देण्याची विनंती केली. यावेळी कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन व असोसिएशन पदाधिकारी कमलाकांत कुलकर्णी, बाबासो कोंडेकर, हॉटेल मालक असो चे अध्यक्ष सचिन शानभाग, पदभा्नाभ पाटील व सकाळ चे यतिश शहा, उपस्थित होते.
त्याच बरोबर अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री.धीरज कुमार यांचीही यावेळी कोल्हापूर फर्स्टच्या पदाधिका-यांनी भेट घेतली.