Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर, दि. १७ मे:- अमृत महोत्सवी अग्रगण्य औद्योगिक संस्था कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर तर्फे रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा. डॉ. मुन्ताजअली बाशुमियाँ उर्फ एम. बी. शेख तसेच मॅनेजिंग कौन्सिलपदी फेरनिवड झाल्याबद्दल मा. श्री. अजित पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार समारंभ उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. शिवाजी उद्यमनगर येथील श्री. रामप्रताप झंवर हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमास औद्योगिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष मा. कमलाकांत कुलकर्णी होते. प्रास्ताविकात अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी सत्कारमूर्तींच्या उद्योग, शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. उद्योग क्षेत्रातील व्याप सांभाळत असतानाच शिक्षण संस्थेसाठी बहुमूल्य वेळ देणे ही मोठी सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले. रयत शिक्षण संस्थेसारख्या आशिया खंडातील अग्रगण्य शिक्षण संस्थेत नेतृत्वपदावर कार्य करण्यासाठी दृष्टी, समर्पण आणि समाजहिताची जाणीव आवश्यक असते, असेही ते म्हणाले. रयत शिक्षण संस्थेनेही कोल्हापूरातील उद्योग क्षेत्रातील या दोन हि-यांची निवड केलेबद्दल रयत संस्थेचेही कौतुक केले. श्री.एम.बी.शेख आणि श्री.अजित पाटील यांचे औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचीही तसेच त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीची माहिती देवून गौरवपुर्ण उद्गार काढले. कार्यक्रमात असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांनी दोन्ही मान्यवरांचा परिचय करून दिला. त्यांनी मा. डॉ. एम. बी. शेख यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा उल्लेख करताना, रयत शिक्षण संस्थेच्या “कमवा व शिका” योजनेतून शिक्षण घेत उद्योग, शिक्षण व समाजसेवा या क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. वेलप्रो ग्रुपच्या माध्यमातून फाउंड्री, अभियांत्रिकी आणि कृषी आधारित उद्योग उभे करत त्यांनी शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला असून, रयत शिक्षण संस्थेच्या विविध पदांवर कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योगदान दिल्याचे सांगितले. तसेच मा. अजित पाटील यांचा परिचय करून देताना त्यांनी उद्योग क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा विशेष उल्लेख केला. लक्ष्मी अॅग्रो एनर्जी प्रा. लि. तसेच लक्ष्मी सेल्स अँड सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून सौर ऊर्जा, कृषी पंप आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रात प्राचार्य, शिक्षक तसेच रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले. यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या ‘‘कमवा व शिका’’ योजनेतून शिक्षण घेत व संघर्षातून उभे राहून उद्योगाला दिशा देणारे आणि उद्योग,शिक्षण आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रातील प्रभावी व्यक्तीमत्व मा.डॉ.मुन्ताजअली बाशुमियॉ उर्फ एम.बी.शेख यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर यशस्वी उद्योजक म्हणून कार्यरत असतानाच जयांनी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत, संस्थेच्या विकासात मोलाचे योगदान दिले असे उद्योजक श्री.अजित पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलपदी फेरनिवड झालेबद्दल उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन केले. सत्कारास उत्तर देताना मा. डॉ. एम. बी. शेख यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करताना “कमवा व शिका” योजनेने ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा दिल्याचे सांगितले. स्वतःला मिळालेल्या संधीचे ऋण फेडण्याच्या भावनेतून आपण शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग क्षेत्रातील अनुभव आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यवस्थापन यांचा समन्वय साधून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ.एन.डी.पाटील यांचेमुळे रयत शिक्षण संस्थेत प्रवेश मिळला. तुमच्या विचारावर तुम्ही किती ठाम राहा अशी त्यांनी शिकवण दिली. युनिमेटल सिस्टीमचे स्व.दादा शिंदे, चंद्रन मेनन यांनी प्लॅनिंग कसे करायचे ते शिकविले, हेमराज सामाणी यांनी प्रॅक्टीक काम कसे करायचे ते शिवविले, यांचेकडून व्यवसाय कसा करायचा ते शिकलो, पेपर,पेन्सील,पेन यांची संकल्पना त्यांनी सांगितली. उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांकडून शिकण्याची,त्यांचेसोबत काम करण्याची संधी माझा सारख्या भाग्यवंताला मिळाल्याचे त्यंानी सांगितले. असोसिएशन केलेल्या सत्काराच्या ऋुणात रहायला आवडेल असे ते शेवटी म्हणाले. मा. अजित पाटील यांनी आपल्या मनोगतात शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांच्यात अधिक समन्वयाची आवश्यकता अधोरेखित केली. विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि रोजगारक्षम शिक्षण मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. या संस्थेने आपला विकास झपाटयाने झाला. 774 शाखा, 18 हजार शिक्षक स्टाफ इतका प्रचंड मोठा विस्तार या संस्थेचा असलेचे ते म्हणाले. ही संस्था राजकारणमुक्त असून आजही येथे होणारी भरती ही कोणत्याही वशिल्याशिवाय पुर्णपणे गुणवत्तेवर आधारित होते. या शिक्षण संस्थेचा विस्तार अतिशय अतिशय दुर्गम भागात झाला असून आपल्याला 60 टक्के गावांची नांवे देखिल आपण कधी एकली नसतील अश्या ठिकाणी ही संस्था आजही कार्यरत आहे. आमच्या वडीलांनी 50 ते 60 वर्षे या संस्थेत काम केले असून समाजाने दृष्टी दिली त्यान्रमाणे कार्य करित आहे. इंजिनिअरिंग असोसिएशन केलेला हा सत्कार विशेष असून सर्वांचा ऋुणी आहे असे ते म्हणाले. यावेळी मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले चे अध्यक्ष मोहन कुशिरे यांच्या हस्ते श्री.एम.बी.शेख आणि श्री.अजित पाटील यांचे पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्र देवून अभिनंद करण्यात आले. कोल्हापूर फर्स्टच्यावतीने चेअरमन श्री.सुरेन्द्र जैन यांच्या हस्ते श्री.एम.बी.शेख आणि श्री.अजित पाटील यांचे पुष्पगुच्छ अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास असोसिएशनचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद उद्योजक, संलग्न औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, निमंत्रित सदस्य व विविध क्षेत्रांतील मान्यवर संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी असोसिएशनचे सेक्रेटरी नितीन वाडीकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, सभासद, आयोजक व सहका-यांचे आभार मानले. यावेळी सर्वश्री कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे, मॅक-कागलचे अध्यक्ष मोहन कुशिरे, आयआयएफ चे अध्यक्ष राहूल पाटील,उद्यम सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर सुतार, युनिमेटल सिस्टीम्स्चे जेष्ठ उद्योजक अरविंद शिंदे, नितीन वाडीकर,प्रसन्न तेरदाळकर, बाबासो कोंडेकर,सुरेन्द्र जैन, अतुल आरवाडे, हिंदूराव कामते, किरण चरणे, प्रा.सुभाष माने, संजय पेंडसे, संजय पाटील, अॅड.अशोकराव उपाध्ये, प्रदीपभाई कापडिया, श्यामसंुदर तोतला, मॅकचे सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, टेªझरर अमृतराव यादव, संचालक संजय पेंडसे,मुबारक शेख इ., सुरेश मंडलिक, अशोकराव जाधव,श्यामसंुदर देशिंगकर, जयंत शिंदे, मॅकचे-शिरसागर,, मुबारक शेख,दौलत तावडे, चंद्रकांत चोरगे, विश्वजित सावंत,विशाल मंडलिक, संतोष बांदेकर, जितेंद्र बामणे, शंतनु गायकवाड, प्रदीप व्हरांबळे यांच्यासह असोसिएशनचे सभासद संख्येने उपस्थित होते. “उद्योगातील यशाबरोबरच शिक्षण क्षेत्रासाठी वेळ देणा-या उद्योजकांचा सन्मान हा संपूर्ण औद्योगिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला,” अशी भावना उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केली.
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur