कोल्हापूर, दि. ३१ मे -जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज शिवाजी उद्यमनगर व वाय. पी. पोवार नगर औद्योगिक वसाहत परिसरात जनजागृतीपर रॅली काढून तंबाखूमुक्त समाजाचा संदेश देण्यात आला. युवा पिढीला तंबाखू व विविध व्यसनांच्या दुष्परिणामांपासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ब्रम्हाकुमारीज,कोल्हापूर यांचेवतीने आणि मेडिकल विंग व भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय यांचे सहकार्याने ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाव्दारे नशामुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत ब्रम्हाकुमारील बरोबर दि.4 मार्च 2023 रोजी नवी दिल्लीमध्ये सामंजस्य करारावर हस्ताक्षर केले आहेत. भारतामध्ये सध्या 372 जिल्हे व्यसनाधीनतेच्या विळख्यात अत्यंत गंभीरपणे सापडले आहेत, दररोज 3750 लोक आणि वर्षाला 13 लाख लोक केवळ तंबाखूच्या सेवनाने मृत्युमुखी पडतात. तर 37 लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू होतो आणि 44 लाख लोकांचा हृदयविकारानो मुत्यू होतो. व्यसनमुक्त आणि निरोगी समाज निर्मितीसाठी आयोजित या रॅलीचा शुभारंभ कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच असोसिएशनतर्फे या उपक्रमास सक्रीय पाठिंबा देण्यात आला. औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, कर्मचारी आणि नागरिकांनी या रॅलीत सहभाग नोंदवत तंबाखूविरोधी जनजागृतीचा संदेश, उद्योजक, कामगार व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविला. यावेळी तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम, कर्करोगासह विविध आजारांचा वाढता धोका, तसेच सामाजिक व आर्थिक नुकसान याबाबत माहिती देण्यात आली. “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत युवकांमध्ये सकारात्मक जीवनशैली, आरोग्यदायी सवयी आणि व्यसनमुक्त जीवनाचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. ब्रम्हाकुमारीजमध्ये राजयोगी जीवनशैली शिकवली जाते, ज्याव्दारे आपण आपल्या विचारांना सकारात्मक दिशा देऊ शकतो, परिणामस्वरूप इच्छाशक्ती, स्वाभिमान, अतिंद्रिय सुख, सहनशक्ती, मानसिक शांती वाढते, जी व्यसनांच्या दुष्ट चक्रातुन मुक्त होण्यास मदत करते. व्यसनमुक्ती मुक्तीसाठी मोफत होमीओपॅथी औषधे मोफत दिली जातात. तंबाखूविरोधी दिनाचा मुख्य उद्देश केवळ तंबाखू सेवनामुळे होणा-या घातक परिणामांविषयी जागृती करणे नसून, भावी पिढीला व्यसनांच्या संकटापासून संरक्षण देणे हा आहे. या परिसरातील कारखान्यामध्ये जावून मालक व कर्मचा-यांना प्रत्यक्ष भेटून वेसनाच्या दुष्परिणामाची माहिती दिली. या जनजागृती मोहिमेमुळे औद्योगिक वसाहती परिसरात तंबाखूमुक्त वातावरण निर्मितीस चालना मिळाली. यावेळी व्यसनमुक्त रहाणे,कोणतेही नशापाणी नकरण्याची सर्वांनी शपथ घेतली. या उपक्रमाचे आयोजन सेवाकेंद्राच्या वतीने करण्यात आले असून, समाजात व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. य या मोहिमेत डॉ.रश्मी बहेन, डॉ.सुनिता, डॉ.रोहीणी, डॉ.सौ व श्री.माळकर,श्वेताबहेन, प्रतिभाबहेन,मालतीबहेन, विवेकभाई, विष्वासभाई, माहितेभाई, 77 वर्षाच्या गीताबहेन,प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, भगवान माने व मोठया संख्येने ब्रम्हाकुमारिजचे भाई बहेन सहभागी झाले होते.

Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur