कोल्हापूर दि. 2 जून- कोल्हापूर येथे नव्याने पदभार स्वीकारलेले सेंट्रल जीएसटीचे आयुक्त श्री. सुमितकुमार यादव यांचे कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्या हस्ते भगवत गीता आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

यावेळी कोल्हापूर परिसरातील उद्योजक व व्यापा-यांना जीएसटी संदर्भात भेडसावणा-या विविध समस्या व अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जीएसटी 2.0 मध्ये काही सुधारणा झाल्या असल्या तरी अजून कांही सुधारणा आवश्यक असलेबाबत असोसिएशनच्या पदाधिका-यांनी निदर्शनास आणून दिले.  

या विषयावर प्रथम सह आयुक्त श्री. रोहित जोशी यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आयुक्त श्री. सुमितकुमार यादव यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. श्री.यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि उद्योजक व व्यापा-यांचे जे काही प्रश्न असतील त्याचे लेखी निवेदन द्यावे असे त्यांनी सांगितले.  जीएसटी संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हापूरमधील औद्योगिक व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच उद्योजक सभासद यांची संयुक्त बैठक आयोजित करून सविस्तर चर्चा करण्याची तयारी दर्शविली.  

तसेच, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनला भेट देण्याचे निमंत्रणही त्यांना यावेळी देण्यात आले. सीए गिरीश कुलकर्णी यांनी लिहीलेले  GST practical guide. Introduction to GST Returns, Statement and other compliances forms हे पुस्तक आयुक्त सुमितकुमार यादव यांना देण्यात आले.

या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, सह आयुक्त रोहीत जोशी, टे्झरर प्रसन्न तेरदाळकर,संचालक बाबासोा कोंडेकर, कुशल सामाणी,सीए गिरीष कुलकर्णी,प्रदीप व्हरांबळे इ. उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur