कोल्हापूर दि.5 जून -कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआय) अंतर्गत कामगारांना मिळणा-या वैद्यकीय सुविधांबाबत निर्माण झालेल्या विविध समस्या व अडचणींच्या संदर्भात मा.जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी मा.सहायक कामगार आयुक्त यांना औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि ईएसआयसी हॉस्पीटलचे प्रशासन अधिकारी यांची एक बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. सदरची बैठक आज नूतन सहा.कामगार आयुक्त श्री.संदेश आयरे यांच्या अध्यक्षतेखाली सहायक कामगार आयुक्त कार्यालय,व्यापारीपेठ,शाहुपूरी,कोल्हापूर येथे संपन्न झाली. या बैठकीत ईएसआय हॉस्पिटल व ओपीडी सेवांमधील गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, संबंधित समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. सभेच्या सुरवातीला कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्याहस्ते नूतन सहायक कामगार आयुक्त यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत व अभिनंदन करण्यात आले
बैठकीत नमूद करण्यात आले की, कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ईएसआय योजनेंतर्गत आरोग्य सुविधा मिळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः केंद्र शासनाच्या ताराबाई पार्क येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने लाभार्थींना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
असोसिएशन तर्फे खालील समस्या मांडण्यात आल्या.
ईएसआय हॉस्पीटल (केंद्र शासन) ताराबाई पार्क येथील समस्या
1) ब्लड बँकेशी टाय-अप नसणेः- ईएसआय हॉस्पिटलचा कोणत्याही अधिकृत ब्लड बँकेशी समन्वय टायअप नाही. यासाठी तातडीने मान्यताप्राप्त ब्लड बँकेशी टाय-अप करण्यात यावा.
2) आवश्यक तपासणी सुविधांचा अभावः- रक्त तपासणी, सोनोग्राफी तसेच एन्डोस्कोपी यासारख्या महत्त्वाच्या तपासणी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. सदर सुविधा ईएसआय हॉस्पिटलमध्ये तातडीने उपलब्ध करून द्याव्यात.
3) रुग्णांना रेफरल लेटर मिळवण्यासाठी वेळेचा अपव्यय व गैरसोय होत असल्याने रेफरल लेटर देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी. रूग्नांना आयडी दाखवून अॅडमिट करून घ्यावे.
4) ईएसआय हॉस्पीटलमध्ये त्वचारोग तज्ञ उपलब्ध नाहीत.
5) ईएसआय हॉस्पीटल लोकल कमिटीची मुदत सन 2021 ला संपली असून नुतन कमिटी त्वरीत स्थापन करणेत यावी.
ओपीडी सेवा रूग्नालय (महाराष्ट्र शासना) बाबतच्या समस्या
1) एमआयडिसीतील ओपीडीप्रमाणे शहरातील ओपीडीची वेळ सकाळी 8.00 ते रात्री 8.00 अशी करण्यात यावी.
2) ब्लड प्रेशरच्या गोळया ओपीडी रूग्नालयात नियमित मिळत नाही.
3) ईएसआय प्रशासन, औद्योगिक संघटना व लाभार्थी प्रतिनिधी यांच्यात नियमित सभा आयोजित करण्यात याव्यात.
4) टायप रूग्नालयांच्या मुदती संपल्या असल्याने त्यांचे नुतनी करण झालेले नाही ते करणे आवश्यक आहे.
या सर्व समस्या व मागण्यांबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले असून, कामगार व ईएसआय लाभार्थी यांच्या हितासाठी आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्याच बरोबर हॉस्पीटलमध्ये दाखल होणा-या रूग्नांना व्यवस्थित उपचार मिळावेत ही अपेक्षा असल्याचे कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली. त्याच बरोबर यापुढील बैठक ईएसआयसी हॉस्पीटलमध्ये आयोजित करावी जेणेकरून समस्या बाबत प्रत्यक्ष भेट देवून पहाणी करता येते.
चर्चे अंती मा.सहा.कामगार संदेश आयरे यांनी केलेल्या सूचनेनुसार
ईएसआय रूग्नालयाने मान्यताप्राप्त ब्लडबॅंकेशी टायपकरून रूग्नांना रक्त मिळण्यासाठी सोय करावी, सोनाग्राफी, एंडोस्कोपी, रक्त तपासणीच्या सुविधा इनहाउस हॉस्पीटलमध्येच उपलब्ध करून द्याव्यात व यासाठी लागणारी प्रक्रिया त्वरीत सूरू करण्याच्या सूचना दिल्या. त्याच बरोबर कांही समस्या हया धोरणात्मक आहेत उदा. ऑपरेशन थिएटर अजून सुरू झालेले नाही, शहरातील ओपीडी रूग्नालयाच्या वेळा सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत करणे, रेफरेल लेटर सुविधा ऑन लाईन करणे, टायप हॉस्पीटलची मुदत वाढविणे, कोल्हापूरातील ईएसआय लोकल कमिटी गठित करणे इ.संदर्भात ईएसआय हॉस्पीटलच्या प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधून याचा पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रादेशिक कार्यालयासोबत ऑन लाईन सभा आयोजित करून याबाबत चर्चा करण्याचे यासभेत ठरले. उद्योजकांनी त्यांच्याकडील नोंदणीकृत कामगारांचे बायोमेट्ीक व्हेरिफिकेशन थंब इम्प्रेशनव्दारे करून घ्यावे आणि यासाठी ईएसआयसीच्या अॅपव्दारेही हे करू शकता. 40 वर्षावरील कामगारांची विशेश वैद्यकिय तपासणी सुरू असल्याचे कार्यालय अधिक्षक संतोष माळगी यांनी सांगितले व याचा जास्तीत जास्त फायदा कामगार व कर्मचा-यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी नूतन सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, ईएसआय हॉस्पीटलचे मेडिकल सुपरिटेंडंट डॉ.अनिल कुमार, डॉ.रविंद्र पवार, डॉ.घोंगडी, ईएसआय कार्यालय अधीक्षक संतोष माळगी, सेक्रेटरी प्रदीप व्हरांबळे इ.उपस्थित होते.