दरवर्षी प्रमाणे यावर्षीही औद्योगिक वसाहतीतील एक दिवसीय घरफाळा भरणा शिबीर कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथे आयोजित केले होते. या शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबीरात सकाळी 10 ते दुपारी 2.00 यावेळेत चेक,रोख आणि युपीआय व्दारे एकूण रू.14,14,302/- इतका घरफाळा जमा झाला. या शिबीरास महापालिकेचे उपायुक्त किरणकुमार धनवाड, अधिक्षक दत्तप्रसाद माजगावकर, सुधाकर चल्लावाड, अच्युत अडूरकर-वरिष्ठ क्लार्क, क्लार्क अक्षय मगदूम, संग्राम मंडपाळे, स्वप्नील खाडे, ओंकार पोतदार यांनी सहकार्य केले, शिबीराचा शुभारंभ अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी अधिक्षक दत्तप्रसाद माजगावकर यांना पुष्पगुच्छ देवून केला. यावेळी संजय अंगडी,बाबासो कोंडेकर,अतुल आरवाडे, दिपक मिरजे,महाडिक,प्रदीप व्हरांबळे,प्रशांत मोरे इ.उपस्थित होते.

Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur