कौशल्य विकासासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन आणि शिवाजी विद्यापीठ सामंजस्य करार करू-कुलगुरू डॉ.राजनीश कामत

शाहू महाराजांनी शिक्षण व उद्योग हे एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाहीत हे ओळखून दूरदृष्टीने या उद्यमनगरीची स्थापना केली.  या संस्थेला गौरवशाली इतिहास, समृद्ध परंपरा, समाजातील विश्वासार्ह स्थान आणि अनेक वर्षांची उल्लेखनीय औद्योगिक कामगिरी लाभलेली आहे. मोठया विचाराने चालणारी संस्था असून दूरदृष्टीने या संस्थेची घौडदौड सुरू आहे. आयटी,एआय क्षेत्र मोठया प्रमाणात विस्तारत आहे या पार्श्वभूमिवर शासन आणि शिवाजी विद्यापीठ यांनी विचारमंथन केले पाहिजे.  रोजगार निर्मिती, शिक्षण, नवनिर्मिती केली पाहिजे, प्रशिक्षण यावरती भर दिला पाहिजे.  
कोल्हापूरातील मुले रोजगारासाठी बाहेर जात आहेत त्यासाठी फिनिशिंग स्कूलवर भर द्यायला पाहिजे.  अॅप्रेटशिप कायद्यानुसार मोठया प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत.  उद्योगक्षेत्राला नवनिर्मितीची अत्यंत आवश्यकता असून जागतिक स्थरावर गुणवत्ता मानांकने काय आहेत घ् याचा सातत्याने अभ्यास केला पाहिजे आणि यासाठी असोसिएशन आणि शिवाजी विद्यापीठ यांनी एकत्रपणे करू.  बाजारपेठेची गरज ओळखण्यासाठी मार्केंटिंग स्किल वाढविण्यासाठी आपण भर देवू.  असोसिएशन कौशल्य विकास केंद्र सुरू करणार आहे ते आपण शिवाजी विद्यापीठाशी संलग्न करू आणि आम्ही त्याला अक्रिडेशन करून देवू असेही ते म्हणाले.  विद्यापीठात नवनिर्मितीसाठीचे पेटंट असतात त्याचे तंत्रज्ञान उद्योग विश्वात विस्तारित करणे गरजेचे आहे.  तसेच कांही नवनिर्मिती ही उद्योगांमध्येही होत असते त्याचे पेटंट उद्योगानी घेतल्यास त्यांच्या उत्पादनाची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाते आणि याचा त्या उद्योजकास व पर्यायाने या देशासही मोठा फायदा होतो.  ग्रीन ईकॉनामिसाठीही सर्वांनी एकत्र बसून याची रूपरेषा ठरवू असेही कुलगुरू म्हणाले.  

अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी म्हणाले कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने 79 वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण करून 80 व्या वर्षात पदार्पण केले. अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या संस्थापकांचे, माजी पदाधिका-यांचे व ज्येष्ठ उद्योजकांचे योगदान गौरविण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, इंडस्ट्री 4.0 आणि हरित तंत्रज्ञानाच्या युगात उद्योग व शिक्षण संस्थांमधील समन्वय अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. भविष्यात कौशल्य विकास, नवोन्मेष, स्टार्टअप्स, अप्रेंटिसशिप, संशोधन सहकार्य आणि उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी असोसिएशन अधिक प्रभावी भूमिका बजावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. गौरवशाली वारसा जपत जागतिक दर्जाची औद्योगिक परिसंस्था उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.  कोल्हापूरातील औद्योगिक क्षेत्र एका महत्वाच्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे व यासाठी आज आपल्याकडे माननीय कुलगुरू प्रा.डॉ.कामत हे आपल्याला उद्योग शिक्षण समन्वय,नवतंत्रज्ञान व भविष्यातील औद्योगिक संधी या विषयावरील मार्गदर्शन आपल्या सर्वांना नवे विचार व एक नवी उर्जा देईल अशी मला निश्चित खात्री आहे असे ते म्हणाले.

प्रमुख पाहुणे डॉ.कामत यांचा परिचय उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांनी करून दिला.  
डॉ.कामत यांचा शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

असोसिएशनचे नवीन अकरा आजीव सभासद झालेबद्दल त्यांचा कुलगुरूंच्या हस्ते सर्टीफिकेट देवून सत्कार करण्यात आला.  

आभार प्रदर्शन ऑन.सेक्रेटरी नितीन वाडीकर यांनी केले.  या कार्यक्रमास प्रसन्न तेरदाळकर, संजय अंगडी,बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, हर्षद दलाल, अमर करांडे, जयदिप मांगोरे, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले, कोल्हापूर उद्यम सोसायटीचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय थोरवत, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, उपाध्यक्ष विठ्ठल पाटील,संचालक हरिशचंद्र धोत्रे, कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालयाचे सह संचालक अभिजित अवसरे, संजय पेंडसे, शामसंुदर तोतला, शाम देशिंगकर, नलिनी नेने, हिंदूराव कामते, अनिल कुडचे, चंद्रकांत चोरगे, प्रदीपभाई कापडिया, सुरेश मंडलिक, शैलेश पुरोहीत, आनंद माने, देवेंद्र ओबेरॉय,अमित करजगार, किरण चरणे, अमोल गणपुले,विनय सांगले, केदार हसबनीस, विश्वजीत सावंत, प्रकाश तेंडूलकर, नंदकुमार नलवडे,अमित माटे, शांताराम सुर्वे, पद्सिंह पाटील,अजित कोठारी, ,निलेश कदम, ज्ञानोबा कोंढाळकर, सुरज देशपांडे,सचिन रासकर, प्रशांत मोरे, प्रवीण कोठावळे, राम कंुभार, भगवान माने व मोठया संख्येने उद्योजक सभासद उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur