कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. डॉ. संतोष शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मा. अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले, ते म्हणाले कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राची गौरवशाली परंपरा, असोसिएशनची ८० वर्षांची वाटचाल तसेच भविष्यातील उद्योगविकासाच्या दिशेने करावयाच्या कामांचा आढावा घेतला. त्यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत कोल्हापूरच्या उद्योगांची महत्त्वपूर्ण भूमिका असून, आधुनिक तंत्रज्ञान, Automation, Digitalisation, Innovation, कुशल मनुष्यबळ आणि नवीन उद्योजक घडविण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. जागतिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी कोल्हापूरच्या उद्योगांनी जागतिक दृष्टिकोन स्वीकारून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नवीन MIDC क्षेत्रे, विमानसेवा, IT Park, Convention Centre आणि न्यायव्यवस्थेतील सकारात्मक घडामोडींमुळे कोल्हापूरच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
भारतीय स्वातंत्राच्या शतक महोत्सवी वर्षात आज जन्मलेली मुले विस वर्षांनी तरूण असतील व त्यांच्या हातात देशाचे भवितव्य असणार आहे.सरकार, उद्योग आणि विविध संस्थांनी एकत्रितपणे काम करून ‘विकसित भारत, विकसित कोल्हापूर’ हे ध्येय साध्य करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. शेवटी ते म्हणाले तरूण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आपल्या खूप मोठा काम करावे लागणार आहे. यासाठी मेडीटेशन व योगा यासारख्या गोष्टींचा उपयोग करावा.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड. डॉ. संतोष शाह यांचे मा.अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी ’कोल्हापूर येथील सर्किट बेंच व भविष्यातील खंडपीठामुळे उद्योग तसेच कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला होणारे संभाव्य फायदे’ या विषयावर यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले सर्किट बेंच झाले आहेच आता खंडपीठ होणेसाठी दिल्ली दरबारी कार्यवाही सुरू आहे. खंडपीठाचा निर्णय हा राष्ट्पती घेतात. सर्किट बेंच हे माजी न्यायमुर्ती भूषण गवई यांच्यामुळे झाले असे ते म्हणाले.
न्याय व्यवस्थेमध्ये लेजीसलेटर, एक्झीक्युशन व ज्युडीशरी हे सर्व याचा भाग असतात. लोकशाहीची तत्वे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचली पाहिजे. सुप्रीप कोर्ट आता खूप अॅक्टीव्हपणे काम करित आहे. सहा जिल्हयातील कामकाज आता याठिकाणी होत आहे सर्किट बेंचमुळे येथील प्रशासनावर दबाव असतो, इंडस्ट्ीसाठी अॅक्सेस टू जस्टीस, आपले वाद कोर्टात गेल्यास खूप वर्षे वाट पहावी लागते. यासाठी उद्योजकांना मेडीएटरचा यासाठी मोठा उपयोग होतो. आपण आपले विविध करारामध्ये असे नमूद करावे की कांही वाद झाल्यास प्रथम ऑर्बीटेटर कडे जाईल व तेथे वाद सोडविले जातील. याचा खूप मोठा फायदा होतो. बिझनेससाठी आता खूप चांगले कायदे झाले आहेत. आयात व निर्यात दारांसाठीही याचा उपयोग होईल.
प्रमुख पाहुणे अॅड.संतोष शाह यांच्या हस्ते कोल्हापूर उद्यमवार्ताच्या स्वातंत्रदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. मुख्य संपादक व ऑन.सेक्रेटरी नितीन वाडीकर यांनी उद्यमवार्ताबाबत माहिती दिली व मनोगत व्यक्त केले.
यानंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अॅड.शहा यांनी दिली.
अॅड.निलम गांधी यांची Panel of Mediators for the Hon’ble Hight Court पदी निवड झालेबद्दल उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमास सर्वश्री. प्रसन्न तेरदाळकर, संजय अंगडी, बाबासोा कोंडेकर, हर्षद दलाल, अमर करांडे, कुशल सामाणी, जयदीप मांगोरे, अॅड.अशोक उपाध्ये, अशोकराव जाधव, देवेंद्र ओबेरॉय, हिंदूराव कामते, किरण वसा, शाम देशिंगकर,दिलावर शेख,प्रदीपभाई कापडिया,सुरेश मंडलीक, शांताराम सुर्वे, सुभाष चव्हाण, संजय पाटील, अॅड.निलम गांधी, किरण चरणे,विश्वजीत सावंत, शितल दुग्गे, निवास मिठारी, वासुदेव घाडी,विशाल मंडलीक, अनिल दुंडगे, मुनिर महात, सुर्यकांत खोत, आनंदराव सावंत,अरिफ शेख व मरयम शेख, सभासद, उद्योजक, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, प्रवीण कोठावळे, राम कुंभार, भगवान माने इ. तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.