कोल्हापूर, दि. 21 ऑगस्ट : भारत सरकारचे विदेश व्यापार महानिदेशालय, इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सील, एयू स्मॉल फायनान्स बॅंक, भारत निर्यात ऋण गॅरंटी विभाग, भारतीय पोष्ट विभाग यांच्या सहकार्याने कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने जिल्हा निर्यात केंद्र (District as Export Hub) आणि FTA उपक्रमांतर्गत “Niryat Bandhu Seminar on Export Opportunities & Export Facilitation” या विषयावरील परिसंवाद आज कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. कमलाकांत कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. निर्यातविषयक सेमिनार कोल्हापूरच्या उद्योगविश्वासाठी एका नव्या संधीची सुरुवात आहे. आपल्या कोल्हापूरच्या उद्योगांनी गुणवत्ता, कौशल्य आणि विश्वासार्हतेच्या जोरावर देशभर आपली ओळख निर्माण केली आहे. आता हीच गुणवत्ता जागतिक बाजारपेठेत पोहोचविण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, आपल्या सभासदांना ज्ञान, संधी आणि योग्य मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळावे. आजचा कार्यक्रम त्याच प्रयत्नातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यानंतर EEPC India, Western Region चे Regional Committee Member श्री. रवि डोली यांनी Keynote Address द्वारे निर्यात क्षेत्रातील संधींची माहिती दिली. DGFT पुणेचे Joint DGFT श्री. बी. एन. विश्वास, ITS यांनी Export Promotion Mission & FTAs या विषयावर मार्गदर्शन केले. बी. एन. विश्वास यांनी Export Promotion Mission आणि Free Trade Agreements (FTAs) बाबत उद्योजकांना मार्गदर्शन केले. निर्यातीला चालना देण्यासाठी उपलब्ध विविध संधी व योजनांची त्यांनी माहिती दिली. FTAs मुळे भारतीय उत्पादनांना मिळणाऱ्या शुल्क सवलती, नवीन बाजारपेठा व त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया त्यांनी स्पष्ट केली. उद्योजकांनी या संधींचा प्रभावी वापर करून निर्यात वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. EEPC India, Mumbai चे Deputy Director श्री. मुकेश समतानी यांनी Engineering Export Opportunities बाबत माहिती दिली. तसेच निर्यातीसाठी असलेल्या नव्या बाजारपेठेची माहिती दिली. पुण्यात डिसेंबर 2026 मध्ये होणा-या सबकॉन्ट्रॅक्ट इंडिया 2026 या प्रदर्शनाची माहिती दिली. या प्रदर्शात बाहेरच्या देशातील खरेदीदारांना आमंत्रित करण्यात येणार आहे. इंजिनिअरिंग उत्पादने तयार करणारे आणि निर्यात न करणारे आणि सेवापुरवठादार यांनी ईईपीसी इंडिया या कार्यालयाशी संपर्क करून आपणास आवश्यक ती सर्व माहिती व सहकार्या मिळेल आणि यामुळे तुम्ही या कार्यालयाशी जोडले जाल. AU Small Finance Bank, Pune चे श्री. रोहित मोर्डे व श्री. निखिल बकरे यांनी निर्यात पुर्व आणि निर्यातीनंतर आवश्यक असलेल्या Export Finance विषयावर मार्गदर्शन केले व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. ECGC Ltd., Pune चे Branch Manager श्री. प्रणव कुमार यांनी Export Risk Coverage, परदेशात निर्यात करताना असलेले आर्थिक संभाव्य धोके व यापासून संरक्षण होण्यासाठीचे मार्गदर्शन केले. तर Indian Post, Kolhapur चे श्री. सौरभ धमणगे यांनी Export through India Post या विषयांची माहिती दिली. पोष्टाची ऑनलाईन सेवेची माहिती दिली तसेच खासगी कुरियर कंपन्याच्या पेक्षा भारतीय पोष्टाचे सेवादर कमी असलेची आकडेवारीसह माहिती दिली. यावेळी चे श्री. अमर जाधव यांनी EEPC India च्या सहकार्याने निर्यात क्षेत्रातील यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली. ईईपीसी कार्यालयाची कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता या कार्यालयाच्या संपर्कात रहा असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. या कार्यक्रमामुळे कोल्हापूरच्या अभियांत्रिकी उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नव्या संधी, निर्यात प्रोत्साहन योजना, FTA, वित्तपुरवठा, जोखीम संरक्षण आणि निर्यात सुलभीकरणाच्या विविध माध्यमांची माहिती मिळाली. कोल्हापूरातील अधिकाधिक उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात पुढे येऊन जागतिक बाजारपेठेत आपल्या उत्पादनांचा ठसा उमटवावा, हा या परिसंवादाचा प्रमुख उद्देश होता. एकूण 110 निर्यातदार व निर्यात करून इच्छीणा-या उद्योजकांनी यामध्ये मोठया संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित प्रश्नोत्तर सत्रात उद्योजकांनी निर्यातीशी संबंधित विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. निर्यात क्षेत्रात नव्याने प्रवेश करू इच्छिणाऱ्या तसेच विद्यमान निर्यातदारांसाठी हा परिसंवाद अत्यंत उपयुक्त ठरला. यावेळी ईईपीसीचे स्वप्नील बोभाटे, उद्योजक सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. हे उपस्थित होते, सूत्रसंचालन प्रदीप व्हरांबळे यांनी केले.

Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur