टॅली प्राइम हे केवळ अकाउंटिंग सॉफ्टवेअर नसून प्रभावी व्यवसाय व्यवस्थापनाचे साधन श्री.शिवापूरकर कोल्हापूर, दि. १७ ऑक्टोबर २०२६ कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन (KEA) आणि टॅली प्राइमच्या सहकार्याने तसेच इन्स्टाकॉम्पच्या सहभागातून उद्योजक व औद्योगिक व्यावसायिकांसाठी ‘A Session on Tally Capabilities’ या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन असोसिएशनच्या शिवाजी उद्यमनगर येथील सभागृहात करण्यात आले. या सत्रामध्ये टॅली प्राइमच्या विविध क्षमतांची माहिती देऊन, त्याचा उपयोग केवळ लेखांकनापुरता मर्यादित न ठेवता व्यवसाय व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीस अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी इन्स्टॉकामचे संचालक श्री.शिवापूरकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. मार्गदर्शनामध्ये श्री.शिवापूरकर म्हणाले टॅली हे प्रामुख्याने अकाउंटिंगसाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर असल्याची सर्वसाधारण धारणा आहे. मात्र, टॅली प्राइमच्या माध्यमातून उद्योगमालकांना आपल्या व्यवसायातील आर्थिक व्यवहार, व्यवस्थापनविषयक माहिती आणि महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय यासाठी उपयुक्त ठरणारी विविध साधने उपलब्ध होऊ शकतात. या दृष्टिकोनातून उद्योजकांनी टॅलीकडे केवळ अकाउंटिंग सॉफ्टवेअर म्हणून न पाहता, व्यवसायाच्या प्रगतीसाठी उपयुक्त व्यवस्थापन साधन म्हणून पाहावे, हा या सत्राचा प्रमुख उद्देश होता. या मार्गदर्शन सत्रामध्ये उद्योजकांच्या दृष्टिकोनातून टॅली प्राइमचा वापर, MIS (Management Information System) रिपोर्ट्सची उपयुक्तता, टॅलीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सुविधा, व्यवसाय व्यवस्थापनातील टॅलीची भूमिका आणि टॅलीच्या भविष्यातील विकासाची दिशा या महत्त्वाच्या विषयांवर माहिती देण्यात आली. खासकरून टॅलेमधील व्हॉटस्अॅपचा उपयोग, क्लाउड अॅक्सेस, विविध बॅंकांशी टॅलेची कनेक्टीव्हीटी, भारत कनेक्टव्दारे एका कंपनीच्या टॅलेशी दुस-या कंपनीच्या टॅलेची कनेक्टीव्हीटी, पेमेंट केल्यानंतर पॉपअप व्दारे मिळणारे अलर्ट, मोबाईलवर टॅलेचे रिपोर्ट मिळण्याची सोय,Try Know चे नविन फिचर्स, टॅलेमधील कॅलक्युलेटरचे सर्व करण्यासाठीचे उपयोग, जीएसटी नंबरव्दारे दुस-या कंपनीची माहिती व त्यांनी गेल्या सहा महिन्यात भरलेल्या रिर्टनची माहिती कशा प्रकारे पहायची, त्याच बरोबर समोरच्या पार्टीने आपल्या बिलाचा सेटऑफ घेतला आहे की नाही हे पहाता येते याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. उद्योगमालकांना व्यवसायातील विविध घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी, उपलब्ध माहितीचे विश्लेषण करण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी MIS रिपोर्ट्स महत्त्वाचे ठरतात. टॅली प्राइममधील उपलब्ध सुविधांचा प्रभावी वापर केल्यास व्यवसायाचे आर्थिक चित्र अधिक स्पष्टपणे समजण्यास आणि व्यवस्थापन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यास मदत होऊ शकते, यावर या सत्रात भर देण्यात आला. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) व्यावसायिक कामकाजातील वाढता वापर, डिजिटल साधनांद्वारे व्यवस्थापनात होणारी सुधारणा आणि भविष्यातील व्यावसायिक गरजांनुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे आयोजित या उपक्रमामुळे उद्योजकांना दैनंदिन लेखांकनाच्या पलीकडे जाऊन टॅली प्राइमचा व्यवसायवृद्धी, माहितीचे विश्लेषण आणि व्यवस्थापनासाठी कसा उपयोग करता येईल, याची दिशा मिळाली. उद्योगांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविणे आणि उद्योजकांना आधुनिक व्यावसायिक साधनांची माहिती उपलब्ध करून देणे, या उद्देशाने असोसिएशनतर्फे अशा उपयुक्त मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमास वेळ अपुरा पडल्याने पुन्हा एकदा या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्याचे ठरले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्न, शंकाचे निरसन श्री.शिवापूरक आणि टॅलेच्या टिमने केले. या कार्यक्रमास सर्वश्री कमलाकांत कुलकर्णी, कुशल सामाणी, स्वरूप पेंडसे, सुशमा मगदूम, संतोष बांदेकर, जमिर रूकडीकर, फिरोज बिकाटे, श्रुती कुलकर्णी, रोहन तोडकर,प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, प्रवीण कोठावळे, टॅले टिमचे पदाधिकारी,स्टाफ इ.उपस्थित होते


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur