उद्योग जगताचा आधारवड हरपला.इंजिनिअरिंग असोसिएशनच्या शोकसभेत अनेकांनी वाहीली श्रध्दांजली.

 

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक , कोल्हापूर उद्यम सोसायटीचे अध्यक्ष व कोल्हापूर वासियांचे लाडके आमदार स्व.श्री.चंद्रकांत जाधव आण्णा यांचे दुःखद निधनानिमित्त कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन आणि कोल्हापूर उद्यम सोसायटी यांनी संयुक्त शोकसभेचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांनी खालील प्रमाणे आपली श्रध्दांजली वाहीली आणि आठवनींना उजाळा दिला.  ही शोकसभा उद्योगपती माधवराव बुधले सभागृह येथे संपन्न झाली.

 

सचिन मेनन-अध्यक्ष,कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन

जेंव्हा मला आण्णांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळी पटकन विश्वास बसेना.  त्यानंतर सन 1994 पासूनचा त्यांचा प्रवास डोळयासमोर येवू लागला.  आमदार साहेब यांना आमदार होण्यापुर्वीपासून चंदू या नावानेच हाक मारत असू.  सन 2000 पासून आमची चांगली ओळख झाली.  त्यामुळे आम्ही उद्योगांवर नेहमी चर्चा केली.  आण्णा हे उद्योगांच्या विकासासाठी राजकारणात गेले होते.  ते एक यशस्वी उद्योजक होते.  त्यांचेवडील श्री.पंडितराव जाधव व आमचे वडील श्री.राम मेनन हे चांगले मित्र होते.  मला उद्योगामध्ये येण्यापुर्वी ब-याच सोई मिळाल्या होत्या परंतु चंदूने कारखान्यातील अगदी पहिल्या पायरीपासून पासून काम करून यशस्वी उद्योजकां पर्यंत मजल मारली आहे. त्यांचे चेह-यावरील हास्य कधीच कमी झालेले पाहिले नाही.  ते एक स्पोर्टमन स्पिरीट चांगले होते.  तुम्ही कधी हार मानू नका असे ते नेहमी म्हणायचे.  एखादे काम होत नसेल तर ‘‘ माझे काम होत नसेल तर सामान्य माणसांची कामे कशी होणार.’’ त्यामुळे सामान्य माणसांची कामे पूर्ण होण्यासाठी ते शासन आणि प्रशासनावर आग्रही राहत असत.  अनेक संस्थावर त्यांनी प्रतिनिधीत्व केले. एखादे न होणारे कामही ते कश्यापध्दतीने पूर्ण करता येईल यांचा ते सतत विचार करत असत.  उद्योग जगतास हा मोठा धक्का आहे.  त्यांच्या कुटंुबियांना हे दृःख सहन करण्याची शक्ती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

 

 

संजय पेंडसे:- अध्यक्ष मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले.

                आमदार जाधवसाहेब हे एक सच्चा व प्रामाणिक माणूस होतो.  सर्वांना सोबत घेवून जाणारा.  खांदयावर हात टाकून नेणारा माणूस होता.  अनेकांना नोक-या दिल्या. अनेकांना उद्योग उभे करण्यास मदत मिळाली.  दातृत्वशिल, मितभाषी व कधीही प्रसिध्दीसाठी काम न करणारा माणूस म्हणजे आमदार जाधवसो होत.

 

शिवाजीराव पोवार- उपाध्यक्षः- कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज.

                आमदार जाधवसाहेब हे दिलेला शब्द पाळणारे आमदार हाते.  कोणत्यापध्दतीने काम केल्यास यश मिळेल याचे ते सतत मार्गदर्शन करित असत.  पापाच्या तिकटीच्या चप्पल लाईनचा रस्ता दिलेल्या शब्दाप्रमाणे करून दिला.  त्यांचे कार्य खरोखरीच प्रेरणादायी होते.

 

दिनेश बुधले:- संचालक,कोल्हापूर उद्यम को.ऑप.सोसायटी

                आमदार जाधवसाहेब हे आमचे बंधुतुल्य मित्र,सहकारी,मार्गदर्शक, व लाडके आमदार होते.  औद्योगिक कामानिमित्त सतत आमचा संर्पक यायचा.  ते एक चांगला माणूस, यशस्वी उद्योजक व देव माणसातील देव माणूस होते.  उद्योग-व्यापारावर होणारा अन्याय, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण नेहमी रणांगणात उतरायला पाहिजे व याचसाठी ते नेहमी धडपडत असत.  उद्योगांवर लादलेले कठोर निर्बंध मार्गस्थ करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील कोणतरी असलाच पाहिजे असे त्यांचे मत होतेे.  वीजदरवाढ रोखण्यासाठी त्यांनी दिलेला लढा अविस्मरणिय आहे.  त्यांची जिद्द, चिकाटी, मोठी होती.  त्यांना कधीही चिडलेले पाहिले नाही.  सामान्य माणसाने नेहमी माझयाशी डायरेक्ट संपर्क साधला पाहिजे असे ते म्हणत.  नविन विचाराने काम केले, कोणालाही नाराज केले नाही.  चित्रपट क्षेत्रातही त्यांनी काम केले.

 

श्री.मोहन पंडितराव-अध्यक्ष,गोकूळशिरगांव मॅन्यू.असोसिएशन

                आण्णांची दुःखद बातमी समजली तेंव्हा सामान्य माणूस ते उद्योजक यांना धक्का बसलाच तर कामगारांनीही अक्षरशः टाहो फोडला इतकी वाईट घटना आण्णांच्या जाण्याने झाली.  अनेकांची कामे केली.  गोशिमाचे सिएफसी सेंटर नावारूपास यावे हे त्यांचे स्वप्न होते.  त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू हीच त्यांना खरी आदरांजली ठरले.

 

संगिता नलवडे:- संचालिका,कोल्हापूर उद्यम सोसायटी

को.उद्यम सोसायटीच्या माध्यमातून उद्योजकांची प्रगती कशी होईल यासाठी सतत प्रयत्न करणे, उद्योग वाढविणे, कोल्हापूरचा विकास चांगला व्हावा, वयोवृध्द व तरूणांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी अनेक बगींचांचे काम करून सुधारणा केल्या.  कोल्हापूरातील डेªनेज सिस्टीम सुधारण्यासाठी काम केले.  अनेक रूग्नांवर यशस्वी उपचार होण्यासाठी , कोरोना काळात सर्वांचे लसीकरण होण्यासाठी मोठे काम केले.  महिलांसाठी बचत गटातून कामे यशस्वी होण्यासाठी चांगले प्रयत्न केले. 

 

दिपक पाटील:- अध्यक्ष, शिरोली मॅन्यू फॅक्चरर्स असोसिएशन

कोल्हापूरचा एक उमदा आमदार गेला.  ते इतक्या लवकर जायला नको होते.  त्यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा हादरा बसला आहे.  सर्वसामान्य माणासापासून ते उच्चभू्र लोकांपर्यंत पोचलेली ती एक असामान्य व्यक्ती होती.  उद्योजकांचे प्रश्न बेधडक मांडणारा व समर्पकपणे मांडायचे.  बहुआयामी व्यक्तीमत्व आपल्यातून निघून गेले ही खूप मोठी हानी उद्योग क्षेत्राची झाली आहे. 

 

सुरेंद्र जैन :- संचालक ,शिरोली मॅन्यू. असोसिएशन

  इथे बसलेल्या अनेक लोकांचा भावना ऐकल्यानंतर असे लक्षात येते की, आमदार जाधवसाहेब हे मनापासून काम करणारे आमदार होते.  कष्टाने काम केले.  त्यांचे हातही हातोडयासाखरे होते.  दोनच दिवसापुर्वी उद्योग-व्यापार क्षेत्राचे आमदार आहेत आणि आता होते म्हणण्याची दुदैवी वेळ आपल्यावर आली आहे.

 

भानूमल ओसवाल:- प्लायवूड असोसिएशन

आमदार जाधव साहेब हे दैदिप्यमान व असामान्य व्यक्ती होते.  काहीही समस्य व काम असेल आणि त्यांना फोन केला कि ते लगेच हजर रहात असत.  अनेक रूग्नांना वेळेत उपचार मिळण्यासाठी ते म्हणत मी पैसे भरतो परंतु ताबडतोड उपचार करा.  एलबीटीच्या प्रश्नांतही लक्ष घालून उद्योजक-व्यापा-यांना नेहमी सहकार्य केले.

 

                शोक सभेच्या सुरवातीस श्री.सचिन मेनन यांच्या हस्ते श्री.चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.  त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभेराहून श्रध्दांजली वाहीली.

या शोक सभेस सर्वश्री.सचिन मेनन, हर्षद दलाल, दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, दिपक पाटील, चंद्रकांत चोरगे,  मोहन पंडितराव, संजय पेंडसे, एम.वाय.पाटील, शिवाजीराव पोवार, श्रीकांत दुधाणे, रणजीत शाह, नितीन वाडीकर, बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, जयदीप मांगोरे, सोहन शिरगांवकर, अभिषेक सावेकर, जयराजभाई वसा, प्रदीपभाई कापडिया, अरविंद शिंदे, व्यंकटेश देशपांडे, सागर नलवडे, सचिन देसाई, सुभाष चव्हाण, नंदकुमार नलवडे, भानूमल ओसवाल, सुरेंद्र जैन, दिलीप चव्हाण, विनय खोबरे, राजन सातपुते, प्रताप पुराणिक, पृथ्वीराज कटके, जयवंत राउत, प्रशांत फडतरे, प्रदीप व्हरांबळे इ.उपस्थित होते.

 


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur