Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
Date -12 Feb 2025
सायबर गुन्हाशी लढण्यासाठी नेहमी सतर्क रहा-अॅड.जयश्री नांगरे सायबर गुन्हा कधीही, कोठेही आणि कोणा बरोबरही होवू शकतो त्यामुळे त्यांच्याशी लढण्यासाठी नेहमी सतर्क राहा असे आवाहन अॅड.जयश्री नांगरे यांनी केले, त्या कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने ‘‘ सायबर गुन्हे,दक्षता आणि उपाय’’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होत्या. आपल्या मोबाईल मध्ये किती अॅप आहेत हेही आपल्या माहिती नसते, त्यापैकी आपण किती वापरतो हे तपासा, अनावश्यक अॅप काढून टाका. एका मोठया उद्योगपतीने विमानतळावर 20 सेकंदासाठी मोबाईल चार्जींगसाठी लावला होता त्या 20 सेकंदात त्या संपूर्ण मोबाईलचे क्लोन करण्यात आले आणि पुढे या कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला. स्मार्ट फोन हे भयंकर आहेत,त्यापासून सावध रहा, हॅकर्स आपल्यापेक्षा दहापट हुशार आहेत, त्यामुळे स्मार्ट फोनप्रमाणे आपणही त्याचे संपूर्ण ज्ञान घेवून स्मार्ट राहिले पाहिजे. सोशल मिडीया आणि आर्थिक व्यवहारासाठी वेगवेगळा मोबाईल वापरल्यास धोका कमी होतो. तुमचा कष्टाचा पैसा सायबर गुन्हेगारांना मिळण्यापासून आपण थांबवायला हवा, कारण हा पैसा अतिरेकी कारवायासाठी वापरला जावू शकतो. एखाद्या देशाशी लढण्यासाठी आता घातक शस्त्रानी लढण्याचे दिवस गेले आता अश्या प्रकारे सायबर गुन्हयाव्दारे एखाद्या देशाला आर्थिक नुकसान पोचवून देश कंगाल करणे आणि तो नष्ट करण्यासाठी गुन्हेगार सक्रिय झाले आहेत आणि ते मास्टर माईंड आहेत. बाहेरिल वायफाय वापरू नका, डिजीटल सिग्नेचर वापरून फ्रॉड वाढू लागले आहेत आणि हे जगात सर्वत्र घडत आहे. आपले वायफाय व नेटवर्क वापरूनही फ्रॉड करू शकतात, त्यामुळे आपले नेटवर्क हॅकप्रुफ आहे का ? ते तपासून पहाणे गरजेचे आहे. आपल्या फेक मेल व जीमेल ओळखता येत नाही त्यामुळे यासाठी फिल्टर लावणे, अॅन्टी व्हायरस आणि मालवेअर वापरायला हवे. तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा हवी. तुम्हाला अनपेक्षित फोन येतो आणि तुम्हाला कर्ज मंजूर झाले आहे, त्यानंतर लगेचच तुमच्या खात्यावर 25 लाख जमा होतात व नंतर ते चाळीस खात्यावर पाठविले जातात असे प्रकार घडतात व नंतर पोलीस येवून तुमची चौकशी करतात त्यामुळे हे प्रकार खुपच गंभीर असून याचा मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास होतो. डार्कनेट वर्क वापरून सायबर गुन्हे घडविले जात आहेत. तुमचे पासवर्ड खुप मजबूत ठेवा, सतत ते बदलत रहा, पासवर्डसाठी आईवडील, मुलगा,मुलगी,पत्नी यांची नांवे देवू नका, बाहेरिल क्युआर कोड स्कॅन करताना दक्षता घ्या. सध्या रोबोटिक व एआयची सुरवात झाली आहे त्यामुळे यापुढे सायबर गुन्हेगारांशी दोन हात करण्यासाठी सज्ज रहा. गुन्हा घडल्यानंतर दोन तासाच्या आत राष्ट्रीय सायबर सुरक्षा वेबसाईट https://cybercrime.gov.in यावरती लगेचच तक्रार नोंदवा. तसेच 1930 या नंबरवरही तक्रार करू शकता. गुन्हा घडल्यापासून दोन तासाच्या आत तक्रार केल्यास आपल्याला आपले पैस परत मिळू शकतात. तसेच बॅंकांचही जबाबदारी असते, शिवाय बॅंकानी प्रत्येक खात्याचा विमा उतरविलेला असतो त्यामुळे वरील प्रमाणे दक्षता घेतल्यास आपले पैसे 18 टक्के व्याजासह परत मिळातात. डेटा प्रोटेक्शन कायदा लागू झाला असल्याने तुम्ही बॅंकांकडे वरील प्रमाणे रितसर तक्रार केल्यास पाच कोटी पर्यंतची नुकसान भरपाई मागू शकता असे अॅड.नांगरे म्हणल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. आपल्याला याबाबत कांही माहिती पाहिजे असल्यास मोबाईल क्र.98226 37888 यावरती संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले. श्री.किरण व्हनगुत्ते यांनी त्यांच्या खात्यात चुकुन जमा झालेले रू.5 लाख परत केले, त्यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्ष बाबासो कोंडेकर यांनी प्रास्ताविक करून हे व्याख्यान आयोजित करण्या मागचा हेतू स्पष्ट केला आणि सामान्य जनतेचा पैसा वाचविण्यासाठी, सायबर गुन्हाबाबत जनजागृती करण्यासाठी आजचे व्याख्यान उपयुक्त ठरेल असे म्हणाले. उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी अॅड.नांगरे यांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन सेक्रेटरी प्रसन्न तेरदाळकर यांनी केले. सूत्रसंचालन सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी केले. यावेळी बाबासो कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, नितीन वाडीकर, कुशल सामाणी,हिंदूराव कामते, सुरेश मंडलीक, अशोकराव जाधव, संगीता नलवडे,जयकुमार पवार, नंदकुमार नलवडे, मुबारक शेख, सागर जाधव, अॅड.नोटरी स्वप्नराणी कंुभार, कैलाश दिक्षित, शिवप्रसाद पेंडसे, प्रसाद चौगुले, राजेंद्र रावळ, भाग्यश्री आळवेकर, अभिषेक गावडे, विद्या पेंडसे, रसिका परळकर, मकरंद सावंत, नरेश बागे, अॅड.दिपाली जाधव,आरिफ शेख, अबुकर शेख, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, प्रविण कोठावळे, राम कंुभार, भगवान माने इ.उपस्थित होते.
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur