Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री.कमलाकांत कुलकर्णी यांची तर उपाध्यक्षपदी श्री.श्रीकांत दुधाणे यांची निवड.
कोल्हापूर दि. 26 : येथील कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या संचालक मंडळाची सभा संपन्न झाली. या सभेत सन 2025-26 करिता पुढील प्रमाणे पदाधिका-यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री.कमलाकांत कुलकर्णी यांची तर उपाध्यक्षपदी श्री.श्रीकांत दुधाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ऑन.सेक्रेटरी पदी श्री.कुशल सामाणी यांची तर खजिनदारपदी श्री.प्रसन्न तेरदाळकर यांची निवड करण्यात आली. कोल्हापूर उद्यमवार्ताच्या मुख्य संपादकपदी संचालक श्री.नितीन वाडीकर यांची फेरनिवड करण्यात आली. संचालक श्री. सचिन मेनन यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. निवडीनंतर सर्व नविन पदाधिका-यांचे उपस्थितांनी पुष्पगुच्छ देवून हार्दीक अभिनंदन केले. माजी अध्यक्ष श्री.बाबासो कोंडेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सभासदांच्या व संस्थेच्या हिताचे कामकाज केलेचे सांगितले तसेच वर्ष भरात विविध समारंभ, सभा, सभासदांसाठीचे उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संचालक,निमंत्रित सदस्य यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. नुतन अध्यक्ष श्री. कमलाकांत कुलकर्णी यांनी भविष्यातील असोसिएशनच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले तसेच अध्यक्षपदी निवड केलेबद्दल संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले. सभासद उद्योजकांचे विषय आणि प्रश्न विविध शासकीय विभागाकडील योजना तसेच समस्या सोडविण्यासाठी कार्य सुरू आहे तो पाठपुरावा सुरू राहील असे म्हणाले. यावेळी संचालक श्री.सचिन मेनन आणि श्री.दिनेश बुधले यांनी नूतन पदाधिका-यांना मनोगत व्यक्तकरून शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर उद्यम सोसायटीच्या संस्था गटातून आपल्या असोसिएशनचे संचालक श्री.अतुल आरवाडे यांची बीनविरोध निवड झालेबद्दल संचालक श्री.सचिन मेनन यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्व सचिन मेनन, कमलाकांत कुलकर्णी, बाबासो कोंडेकर, प्रसन्न तेरदाळकर, दिनेश बुधले, संजय अंगडी, नितीन वाडीकर, अतुल आरवाडे, हर्षद दलाल, अमर करांडे, अभिषेक सावेकर,कुशल सामाणी, प्रदीप व्हरांबळे, इ. उपस्थित होते.
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur