Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
आनंदाने आणि दिर्घायुष्यी जगणे म्हणजे इकिगई -डॉ.ए.एम.गुरव आपल्या जिवनातील सर्व चांगल्या गोष्टी प्राप्त करणे म्हणजे इकिगई. दुस-यासाठी जगतो त्यावेळी आपणास जास्त आनंद होतो. जिवन जगणे ही कला आणि आणि आपण ती आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन डॉ.ए.एम.गुरव यांनी केले ते कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या इकिगई एक जापनीस संकल्पना या विषयावरील माहितीपर चर्चासत्रात बोलत होते. कामामधील आनंद म्हणजे इकिगई. अर्थपुर्ण जीवन, दुस-याच्या चेह-यावरील आनंद म्हणजे इकिगई. प्रत्येक तीन वर्षांनी आपल्या जीवनात नवीन कांहीतरी सकारात्मक बदल करा, फॅक्टरीमध्ये बदल करा, घरामध्ये बदल करा, कारण बदल हा जीवनातील अविभाज्य घटक आहे. आपण घरातील प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस केली पाहिजे. त्यामुळे समाधानी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. तुमचे कौशल्य, अनुभव, नैसर्गिक गुण हे वापरले पाहिजेत. असणे म्हणजे काय ? तर आपण असणे म्हणजेच इकिगई. आपण नेहमी कर्मचा-याची नियुक्त करताना मुलाखत घेतो परंतु एकाद्या कर्मचा-यांने राजीनामा दिला तरी त्याची मुलाखत घ्या त्यातुन अनेक चांगल्याबाबी आपल्या लक्षात येतील. आनंदी आणि दिर्घकालीन आयुष्य म्हणजे इकिगई होय. आपण सध्या 70 टक्के भूतकाळाचा, 10 टक्के वर्तमान काळाचा तर 20 टक्के भविष्य काळाचा विचार करून जगातो, त्याऐवजी 10 टक्के भविष्यकाळाचा, 70 टक्के वर्तमान काळाचा आणि 20 टक्के भविष्य काळाचा विचारा करा म्हणजे अनेक समारात्मक बदल होतील. चुकिचे विचार आपली शक्ती काढून घेतात तर योग्य विचार आपल्याला नेहमीच शक्ती देतात. आनंदी जीवन शैली, सामाजिक बांधिलकी, सामाजिक आपुलकी, मित्रत्वाची भावना, समाधान, वाढत्या वयाबरोबर तरूण होत जाल. आपल्या जीवना सात उत्कृष्ट डॉक्टर आहेत ते म्हणजे, सुर्य, विश्रांती, व्यायाम, पोषक आहार, स्वतःबद्दल आदर आणि आपले मित्र हे लक्षात ठेवा जे तुम्हाला नेहमी आनंदी आणि उत्साही ठेवतात. आपल्या अंर्तआत्मातील विचार जे सांगतात त्याप्रमाणे जगा. आपल्या प्रत्येकात चांगले गुण असतात, त्यापैकी पाच चांगल्या गुणांची माहिती आपणास असली पाहिजे, स्वतःला ओळखा. सातत्याने प्रयत्न करित रहा, नेहमी हळू आवाजात बोला, तुमच्या तणावाची कारणे शोधा उदा. ऑफिस, आर्थिक, कौटुंबिक, आरोग्य याचा निट विचार करा. नेहमीच अॅक्टिव रहा रिटायर होवू नका. या कार्यक्रमास सर्व श्री.कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे,अशोकराव जाधव, सुरेश मंडलिक, जयकुमार परिख, संजय माणगावकर,विलास गायकवाड, वसंत सुतार, मंदार कुलकर्णी, राजेश खानविलकर, स्वप्नील शिंदे, विनयकुमार चौगुले, अवधूत शिंदे, विठ्ठल कोतेकर, पी.एस.शिंदे, संतोष बांदेकर, चंद्रमोहन परब, अशुतोष परब, व्ही.एम.महाजन, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे इ. उपस्थित होते.
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur