Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
सन 2014 साली जागतीक योग दिनाची संकल्पना मा.प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्ामध्ये मांडली व यास मान्यतः मिळाली. युनायटेड नेशन व 177 देशांनी पाठिंबा दिलेला जागतिक योग दिन दरवर्षी सन 2014 जगभरात साजरा केला जातो. या निमित्ताने कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशने उद्योजक सभासद व इतरांसाठी योगसनाची प्रात्यक्षिके आयोजित केली होती. श्री.शिरीष पुजारी यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. अध्यक्ष श्री.कमलाकांत कुलकर्णी आपल्या मनोगता मध्ये म्हणाले या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ याबाबत जगभर जागरूकता निर्माण करणे. ‘‘एक पृथ्वी, एक आरोग्य - योगासाठी ही 2025 ची थीम आहे योगा करा, निरोगी रहा, पर्यावरण जपा. हा दिवस उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यातील सर्वात मोठा दिवस वर्षातील दीर्घतम दिवस म्हणूनही ओळखला जातो. यानंतर सभासद उद्योजक श्री.संजय पेंडसे यांच्या हस्ते श्री.शिरीष पुजारी यांना ‘‘भगवगिता ’’ भेट देण्यात आली. उत्तम आरोग्य व विश्वशांतीसाठी प्रार्थना करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व श्री.राजेंद्र रावळ, अवधूत कुलकर्णी, कमाकांत कुलकर्णी, संजय पेंडसे, विजय सराफ, सुहास नाईक, किशोर देशपांडे, किरण बोंगाळे, देशपांडे, नार्वेकर, संजय कात्रे, मुबारक शेख,प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, भगवान माने इ.उपस्थित होते..
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur