"Green Manufacturing, Pollution Control, Related Regulations and Role of Technology to Assist SMEs in Sustainability" या विषयावरील सेमिनार संपन्न.
बदलत्या वातावरणामुळे पर्यावरणासंबंधी उद्योजकांनी जागरूक रहावे- प्रसन्ना राव.
पृथ्वीवरील वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या बाबत उद्योजकांना अधिक शाश्वत आणि पर्यावरणपूरक उद्योग धोरणांची माहिती व्हावी तसेच पर्यावरण, सामाजिक व शासन मूल्य कश्या प्रकारे पाळावीत ESG (Environment, Social, Governance) अनुषंगाने तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येतो हे समजावे यासाठी हा सेमिनार आयोजित केला होता. आंतर राष्ट्ीय स्तरावर पर्यावरणा संबंधी सातत्याने संशोधन सुरू आहे. अनेक प्रकारच्या नवीन बाबी समोर येत आहेत, त्यामुळे उद्योजकांना अनेक पर्यावरण पूरक बाबींचे पालनकरून उद्योग करावे लागणार आहेत. तसेच यातील अनेक बाबींमध्ये क्लिष्टपणा आहे. शासनाची म्हणजेच महाराष्ट् प्रदुषण महामंडाळाच्या विविध परवानग्या घ्याव्या लागतात खासकरून सूक्ष्म, लघु,मध्यम उद्योगांना या गोष्टींचे पालन करतात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच ऑनलाईन माहिती पाठवावी लागते याची माहिती श्री.प्रसन्ना राव आणि डॉ.गणेश भोईटे यांनी सचित्र माहिती दिली.
यानंतर श्रध्दा बेलोसे यांनी "वज्र या साफटवेअरचे" प्रात्यक्षिकव्दारे माहिती दिली. त्यांतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे श्री.प्रसन्न राव, श्रध्दा बेलोसे व डॉ.गणेश भोईटे यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीस मा.अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी या सेमिनार आयोजनाचा उद्देश व माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली तसेच मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून अनुक्रमे कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे, प्रसन्न तेरदाळकर यांनी स्वागत केले. विजय वसगडे यांनी मेे.निरंतरा ईको व्हेंचर आणि डॉ.प्रसन्ना राव व डॉ.गणेश भोईटे यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रदीप व्हरांबळे यांनी केले. सल्लागार ऋतुजा रेडेकर, मोठया संख्येने उद्योजक, शिवाजी विद्यापीठ पर्यावरण विभाग प्रमुख डॉ.आसावरी जाधव, केआयटी कॉलेचे प्रतिनिधी, पर्यावरण सल्लागार व उद्योजक सभासद उपस्थित होते.