उद्यमनगरीचा पाया भक्क्म,ए.आय सारखे नवतंत्रज्ञान आत्मसात करा-सतेज पाटील. आपल्या उद्यमनगरीचा पाया संस्थापक उद्योजकांनी भक्क्म केला आहे आता ए.आय.सारखे नवतंत्रज्ञान आले ते आत्मसात करा असे उद्दगार आमदार सतेज पाटील यांनी केले ते कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या छताखाली आपण सर्व असोसिएशन नेहमीच एकत्र येता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. औद्योगिक विकास होणे, समस्या, मार्गदर्शनपर कार्यक्रमासाठी असोसिएशनचा हा प्लॅटफॉर्म अतिशय महत्वाचा आहे. शतक महोत्सवाकडे वाटचाल करित असताना औद्योगिक विकासाची ही ज्योत पुढे नेने आवश्यक आहे. औद्योगिक जिल्हा म्हणून आपण सातत्याने कार्यरत राहीले पाहिजे. प्रश्न व समस्या हया सातत्याने येत राहणार व आपण सोडविण्याचा प्रयत्नही विविध मार्गाने प्रयत्न करत असतो. निर्यातीसाठी आता एक नविन टॅक्स लागू होणार आहे.

वीजदर आणि सोलर संदर्भातील प्रश्न आम्ही सातत्याने मांडत आहोतच. सत्ता कुणाचीही असूदे प्रामुख्याने आपले प्रश्न सुटले पाहिजेत हे महत्वाचे. येणा-या भविष्याकाळी आपल्याला जेजे कांही करता येईल ते केले पाहिजे. कोल्हापूरला पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया. जेजे कांही कोल्हापूरला आणता येईल आपण आणण्याचा प्रयत्न करूया. गर्जे मराठीच्या माध्यमातून आपण उद्योजकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम करित आहोत यास सर्वांनी उपस्थित राहावे. जागतिक पातळीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वेगावान तंत्रज्ञान आले आहे, हे आत्मसात करणे काळाची गरज बनत आहे. स्वतःला आपण अपग्रेड केले नाही तर आपण प्रगतीत मागेपडू.. याबाबत इंजिनिअरिंग असोसिएशन, केआयटी आणि डी.वाय.पाटील कॉलेज यांनी एकत्र येवून या तिघांचा ग्रुप करून इंडस्ट्ीसाठी काय करता येईल याबाबत या ग्रुपमधील तज्ञानी मार्गदर्शन करावे. तसेच याविषयात नवउद्योजकांनी लक्ष घातले पाहिजे. हे संकट न मानता संधी मानून पुढे जावू. त्यानंतर त्यांनी असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

मा.अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी हया उद्यमनगरी इतिहास, सुरवात कशी झाली हे सांगितले. छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीने ही उद्यमनगर उभा राहीली. आपल्या संस्थापक उद्योजकांना कोल्हापूर ही उद्यमनगरी करण्याचे स्वप्न पाहिले आणि सन 1947 साली हे प्रत्यक्षात खरे केले. उद्यमनगरिचा प्रगतीचा आढावा घेत असताना रौप्य महोत्सवी, सुर्वण महोत्सवी व नुकताच साजरा केलेला अमृत महोत्सवी कार्यक्रमात अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली. आज याठिकाणी अनेक दिग्गज उद्योजक उपस्थित आहेत व अश्या संस्थेच मला अध्यक्ष म्हणून काम करण्याचे भाग्य लाभले. आपण सर्वांनी माझावर ही जबाबदारी दिली ती मी संस्थापक, आजी माजी अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पार पारण्याचा प्रयत्न करित आहे. संस्था स्थापन्यापासूनच्या सर्व अध्यक्षांनी तसेच खासकरून रौप्यमहोत्सवी वर्षाचे अध्यक्ष श्री.वाय.पी.पोवार हे होते- प्रमुख पाहुणे श्री.शंकरराव चव्हाण हे होते.,सुवर्ण महोत्सवी वर्षात अध्यक्ष श्री.बाबाभाई वसा हे होते प्रमुख पाहुणे श्री.अनंतराव दिक्षित. अमृत महोत्सवी वर्षात अध्यक्ष श्री.सचिन मेनन हे होते. प्रमुख पाहुण्या श्रीमती मल्लीका श्रीनिवासन-चेअरमन टॅफे टॅ्क्टर.. फौंड्ी क्लस्टर, कॅडकॅम सेंटर,सीडबी बॅंक करार, कोराना काळमध्ये केलेले काम याचा आढावा घेतला.

आज पर्यंत आपल्या असोसिएशनला भेट दिलेल्या दिग्गज उद्योजकांमध्ये शंतनुराव किर्लाेस्कर, निळकंठ कल्याणी,अरूण किर्लाेस्कर,जमशेद गोदरेज,निर्मलकुमार भोगिलाल,अजित गुलाबचंद,एस.के.फिरोदिया,चकोर दोशी,यशवंत थोरात,एम.एन.चौनी,अरूण पाटणकर,जयकुमार पठारे,डॉ.नरेंद्र जाधव,अतुल किर्लाेस्कर,अरूण फिरोदिया,बाबा कल्याणी,विजय कळंत्री,पी सी अलेक्झांडर,व्ही के जयरथ,प्रा.शिवाजीराव भोसले,गंगाधर गाडगिळ,आण्णासाहेब डांगे,यतिन शाह, वसंत पाटील,बसवराज कल्याणी,सुधिर राशिंगकर,ब्रिगेडिअर असिल सिंह,प्रतापराव पवार,संजय किर्लाेस्कर,गजानन पेंढारकर,डॉ.पतंगराव कदम,दिपक गद्रे,मल्लका श्रीनिवासन,श्री.जयंत हुंबरवाडी गेल्या कांही वर्षात अध्यक्ष म्हणून काम केलेले व सध्या संचालक असलेल्या अध्यक्षांच्या कार्याचा व त्यांच्या कामाच्या वैशिष्टयांचा आढावा अध्यक्ष कुलकर्णीसोा यांनी सादर केला. कांही दिवंगत अध्यक्ष,संचालक मान्यवर उद्योजकांच्या आठवणी सांगून दुखः व्यक्त केले. तसेच असोसिएशनच्या आजी माजी कर्मचा-यांचा कामाचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले.

उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे म्हणाले मी आपल्या असोसिएशनचा रोप्य महोत्सवी, सुर्वण महोत्सवी तसेच अमृत महोत्सवी वर्ष पाहिले आहे व याचा मला अभिमान वाटतो. अनेक उद्योजकांनी या संस्थेसाठी भरीव योगदान दिले आहे. शतक महोत्सवी वर्षाकडे पाहताना असोसिएशन तर्फे आपण नवउद्योजकांना मार्गदर्शन करत राहू 

औद्योगिक प्रगती साधण्यासाठी नेहमी प्रयत्नशिल राहू. कार्यक्रमाच्या सुरवातीस आमदार सतेज पाटील यांचा शाल,श्रीफळ व श्री.अंबाबाईची फोटो फ्रेम देवून मा.अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी व उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर उद्योजकांच्या समस्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर टे्झरर प्रसन्न तेरदाळकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सर्व श्री.कुशल सामाणी, संजय अंगडी, दिनेश बुधले,नितीन वाडीकर, सचिन मेनन, सुरेंन्द्र जैन,बाबासो कोंडेकर, राजू पाटील, सुनिल शेळके,मोहन कुशिरे, संजय पेंडसे,संजय शेटे, राहूल पाटील, अतुल आरवाडी, हर्षद दलाल, अमर करांडे, अभिषेक सावेकर, जयदिप मांगोरे, धनंजय दुग्गे, सुधाकर सुतार, उज्ज्वल नागेशकर, प्रदीपभाई कापडिया,प्रकाश चरणे, हिंदूराव कामते,विज्ञान मंुडे, हरिशचंद्र धोत्रे, किरण वसा,अजय सप्रे,शामसंुदर तोतला,प्रदीपभाई कापडिया,विश्वजीत सावंत, बंडोपंत नलवडे,चंद्रकांत चोरगे, अशोकराव जाधव,केदार हसबणीस, अमित माटे, सुरेश मंडलीक,दिलावर शेख, सुभाष चव्हाण,संदीप मांगोरे, विशाल मंडलीक,धिरज म्हेत्रे, अजित कोठारी, मोहन परब इ.अनेक उद्योजक सभासद उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur