अमेरिकेने टॅक्स दरवाढविल्याने फौंड्ी,मशिनशॉप, टेक्स्टाईल, मेडिकल व अश्या अनेक बाबीवर याचा विपरित परिणाम होणार आहे. सन 1990 साली भारताचे आणि चायनाचे दरडोई उत्पन्न समान होते, परंतु आता चायना आपल्यापेक्षा पाच पटीने पुढे आहे, त्यामुळे चायनाशी स्पर्धा असल्याने सर्व उद्योजकांनी नवीन जग, नविन देशांत जाण्यास सज्ज रहावे असे प्रतिपादन कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी केले ते ध्वजवंदनानंतर झालेल्या उद्योजकांच्या सभेत बोलत होते.

राष्ट् विकसित करणे अवघड आहे परंतु अशक्य नाही. उद्योजकांना आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून निर्यात विषय तसेच जागतिक जर्मन कंपन्यांच्या प्रतिनिधीशी संवाद साधून कास्टींग्ज व फोर्जिंग उद्योगांसाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. त्याच बरोबर गर्जे मराठी ग्लोबल या सारख्या जागतिक पातळीवर मराठी उद्योजकांच्या विकासासाठी कार्य करणा-या संस्थे सोबत विविध विषयावर चर्चासत्रे सेमिनार घेवून उद्योजकांना जागतिक स्थरावरील माहिती देत आहोत. त्याच बरोबर क्रांतीकार आर्टीफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाची अद्यावत माहिती सभासदांना होण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. हे सर्व करत असताना उद्योजकांनी आपले शरीरस्वास्थ उत्तम राखण्यासाठी नियमित व्यायाम, योगा व मेडिटेशन करावे असे आवाहन त्यांनी केले आणि सर्वांना 79 व्या स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यानंतर ग्राहक पंचायत महाराष्ट् कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी ग्राहक पंचायतीच्या कार्याची माहिती सांगितली. मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूनंतरही काही काळ तो ग्राहक असतो त्यामुळे आजच्या धावपळीच्या जगात वस्तु खरेदीत तसेच आर्थिक फसवणूकी होत आहे यापासून सावध रहा असे म्हणाले. जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भदर्गे यांनी ग्राहकांच्या हक्काबद्दल माहिती दिली यामध्ये मानवी जीवनाचे नुकसान व वस्तंूचे नुकसान होवू नये यासाठी तरतुदी आहेत, त्याचबरोबर ग्राहकांना माहितीची अधिकारी, निवडीचा अधिकारी, मत मांडण्याचा अधिकारी, न्याय मागण्याचा अधिकारी आणि पोषक वातावरण मिळण्याचा इ. ग्राहकांचे हक्क असल्याचे सांगितले. जिल्हा संघटक अशोक पोतनिस म्हणाले ग्राहक कोण असू शकत नाहीत याची माहिती दिली त्यामध्ये मालक व नोकर, मोफत वस्तू घेणारे लोक, उत्पादक आणि विक्रेते हे तिन लोक ग्राहक होवू शकत नाहीत. तसेच विज ग्राहकांच्या तक्रारिंचे निवारण करण्यासाठी ग्राहक पंचायत कार्य करते, विज ग्राहक व महावितरणचे अधिकारी यांना बोलावून घेवून ग्राहकांच्या तक्रारी ऐकून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्येही न्याय मिळाला नाही तर पुढे विद्युत ग्राहक तक्रार निवरण मंच म्हणजेच विद्युत लोकपाल यांचेकडे तक्रार करता येते अशी माहीती दिली. यानंतर कोल्हापूर उद्यमवार्ता स्वातंत्रदिनाच्या विशेषांकाचे प्रकाशन अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आले. संचालक व संपादक नितीन वाडीकर हे मनोगतामध्ये म्हणाले उद्यमवार्ता तर्फे नेहमीच चांगले लेख, माहिती, सरकारी जीआर, औद्योगिक घडामोडी, आर्थिक विषयावरील लेख इ.माहिती नियमित प्रसिध्द केली जाते व यास उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.

यानंतर मे.एस.बी.रिशेलर्स प्रा.लि. चे व्यवस्थापकिय संचालक श्री. सचिन शिरगावकर यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया,नवी दिल्ली यांचा बेस्ट इंजिनिअर्स पुरस्कार मिळालेबद्दल अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्याहस्ते शाल,श्रीफळ, श्री.अंबाबाईची चांदीची फोटोफ्रेम देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन शिरगावकर यंानी असोसिएशनचे आभार मानले व शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया,नवी दिल्ली या संस्थेची माहिती दिली. नार्थ इंडिया मधील व देशाच्या इतर भागातील सारखर कारखानदार या संस्थेच सभासद आहे अशी माहीती सांगितली. त्याच बरोबर ते म्हणाले पुढील कांही दिवसात जीएसटी करांमध्ये मोठे बदल होणार असून ते उद्योजकांना दिलासा देणार असतील.

त्यानंतर आपल्या असोसिएशनचे स्विकृत संचालक श्री.सोहन शिरगावकर यांची डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांच्याहस्ते शाल,श्रीफळ, श्री.अंबाबाईची चांदीची फोटोफ्रेम देवून सत्कार करण्यात आला. सोहन शिरगावकर म्हणाले कोल्हापूरला हा पहिलांदाच मान मिळाला असून तीन वर्षासाठी ही निवड आहे. त्यानंतर त्यांनी शुगर हार्वेस्टर या मशिनची माहिती दिली व सर्वांचे आभार मानले. यानंतर असोसिएशनच्या पदाधिका-यातर्फे ग्राहक पंचायत महाराष्ट् जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्री.बाळासाहे पाटील, उपाध्यक्ष सुधाकर भदर्गे, जिल्हा संघटक अशोक पोतनीस, शहर अध्यक्ष सचिन गणबावले, सचिव विजय टकले यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत व आभार मानले. सूत्रसंचालक सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व कुशल सामाणी, प्रसन्न तेरदाळकर, संजय अंगडी, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, बाबासो कोंडेकर, हर्षद दलाल, अमर करांडे, अभिषेक सावेकर, जयदिप मांगोरे, हिंदूराव कामते, सुरेश मंडलिक, अशोकराव जाधव,संजय पाटील, शामसुदंर देशिंगकर,प्रकाश चरणे, चंद्रकांत चोरगे, सुभाष चव्हाण, प्रदीपभाई कापडिया, दिलावर शेख, नंदकुमार नलवडे,निवास मिठारी, अनिल दंुडगे,सुबोध पेंडसे, फारूक हुदली, अबुकर शेख,आरिफ शेख, शैलेश पुरोहीत, सुर्यकांत खोत, पुजा वाडीकर, आदित्य कोंडेकर इ.उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur