निर्यातीसाठी मराठी उद्योजकांना सर्वती मदत गर्जे मराठी करेल-आनंद गाणु. मराठी व अमराठी असे फरक नकरता ज्ञानाची देवाघेवाण करण्यासाठी महाराष्ट्ातील उद्योजकांसाठी गर्जे मराठी ग्लोबल उपलब्ध आहे. स्टार्टअपसाठी आर्थिक मदत मिळणेसाठी, टेक्नॉलॉजीचे ज्ञान मिळणेसाठी, डायव्हीसिफिकेशनसाठी, इतर देशातील कडक नियमांबाबतची माहिती, विद्यार्थ्यासाठी यासर्वांसाठी काय लागेल ते आंम्हास सांगा आंम्ही तुमच्यासाठी काम करू असे उद्दगार गर्जे मराठी ग्लोबलचे अध्यक्ष आनंद गाणु यांनी काढले ते मराठी उद्योजकांसाठी जागतिक बाजारपेठ व एक्स्पोर्ट, मायक्रो एक्स्पोर्ट व महामार्केट पोर्टल याबाबत आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होते. मातृभूमितील आपल्याच बांधवासाठी उद्योजकांसाठी गर्जे मराठी 26 देशात काम करित आहे. जर्मनी, जपान, साउथ आफ्रीका तसेच इतर देशातही मराठी राजदूत आहेत, तसेच अमेरिकेतील राजदूतसोबत गर्जे मराठीचे चांगले संबंध आहेत त्यामुळे मराठी उद्योजकांनसाठी आंम्ही बायर सेलर मीठ घेणे, परदेशांत खरेदीदारांसोबत बैठक घेणे इ.मदतही आंम्ही करू असे श्री.आनंद गाणु म्हणाले. अमेरिकेला आपली मॅनपावर, आपली बुध्दीमत्ताही पाहिजे आहे. कोल्हापूरच्या उद्योजकांची माहीती या महापोर्टलवर प्रसिध्द करू जेणेकरून सर्वांनाच याचा उपयोग होईल. त्याची एक लिंक तयारकरून यापोर्टलवर प्रसिध्द करण्याचे ठरले. संचालक माधव दाबके यांनी महा मार्केट पोर्टल बाबतची माहिती दिली. एका नगाची देखील तुम्ही निर्यात करू शकता, यासाठी आवश्यकती नोंदणी प्रक्रिया पुर्ण करा. तुम्हाला माहिती असलेल्या 25 परदेशातील कंपन्यांची नांवे द्या, आंम्ही त्यांची भेट घेवून देवू, तुमच्या सोबत आमचा ओळखिचा माणूस देवू, पोलंडमध्ये रोबटची फॅक्टरी आहे, तसेच तुम्हाला एखाद्या देशात जायचे आहे तर गर्जेमराठी तुम्हाला हक्काने मदत करेल. संग्रामसिंह जाधव म्हणाले 182 देशांत नेटवर्क पार्टनर आहेत, आंतरराष्ट्ीय व्यापार करताना करारात नमूद केलेल्या सर्व अटी व नियमांचा चांगला अभ्यास व माहिती घेवून मगच करार करा. अभ्यास न करता करार करू नका. अनेकांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका दिवसांचा विलंब देखील तुम्हाला अडचणी आणू शकतो, शिवाय तुमच्या नावावर कायमस्वरूपी बॅडपॅच पडतो. एखादी ऑर्डर पाठविल्यास दुसरी ऑर्डर देखील तयार असावी लागते. आंतरराष्ट्ीय व्यापार करताना कसा करावा यापेक्षा कसा करू नये याचा जास्त अभ्यास करा. लेटर ऑफ क्रेडीटवर अनेकजन न वाचताच सहया करतात हे चुकीचे आहे. परदेशात भारताने भारत मार्ट सुरू केले आहे. येथील उद्योजकांसाठी जग हे कुंभमेळा आहे याचा फायदा घ्या. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट चे सदस्य व्हा,ज्यामुळे जगातील सर्व प्रदर्शनाची माहीती मिळते तसेच यासाठी सूटही मिळते. परदेशातील ईमेलला त्वरीत उत्तर द्या हे महत्वाचे आहे. उद्योजक सचिन शिरगावकर यांनी फौंड्ी, ऑटोमोबाईल उद्योजकांसाठी गर्जेमराठीचे सहकार्य करावे असे आवाहन केले. कोल्हापूरच्या उद्योजकांसाठी रत्नागिरी येथील जयगड पोर्ट जवळ आहे याचा उपयोग करता यावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रमुख पाहुणे माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले गर्जे मराठीची व्याप्ती मोठी आहे. उद्योजक व असोसिएशनचा दुवा म्हणून आमदार सतेज पाटील हे काम करित आहेत. गर्जेमराठीच्या नेटवर्कचा फायदा सर्वांनी घ्यावा. इनोव्हेशनसाठी कॅलीब्रेशन करणे आवश्यक आहे. इंडस्ट्यिल असोसिएटेडसाठी सिलॅबस तयार करून पॉलीस तयार करावी ज्यामुळे कोल्हापूरच्या प्रत्येक व्यक्तीला मोठे करता आले पाहिजे. जगभरात कोठे मार्केट आहे, कोठे संधी आहे यासाठी गर्जे मराठीचा उपयोग करून घेवू. प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी गर्जेमराठीच्या कार्याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या कार्याचीही माहिती दिली. औद्योगिक विकास साधणे, समस्या सोडविणे, एकत्र येवून क्लस्टर योजनाव्दारे विकासात्मक कामे करणे, विविध सेमिनार चर्चासत्रे घेणे, आयटीआयच्या विद्यार्थ्यांनासाठी कार्य करणे इ.ची माहीती दिली. तसेच यापुढे गर्जे मराठीसोबत सामंजस्य करारकरून उद्योजकांसाठी विविध कार्य केले जाणार आहेत. सतिश कडूकर यांनी गर्जे मराठी कशाप्रकारे मदतकरू शकते याची माहीती घेतली, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांनी येथील आयटीआयसाठी गर्जे मराठी ग्लोबल ने मदत करावी असे आवाहन केले. स्मॅकचे आय.ए.पाटील यांनी स्मॅक एक्सपोर्ट सेल व्दारे करित असलेलया कार्याची माहीती दिली. प्रमुख वक्ते गर्जे मराठी ग्लोबलचे अध्यक्ष श्री.आनंद गाणु, संचालक श्री.माधव दाबके, संचालक श्री.संग्रामसिंह जाधव यांची ओळख करून दिली. यासर्वांचा आणि प्रमुख पाहुणे माजी आमदार श्री.ऋतुराज पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि श्री.अंबाबाईची चांदीची फ्रेम देवून अनुक्रमे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, सेक्रेटरी कुशल सामाणी, टे्झरर प्रसन्न तेरदाळकर यंाच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन टे्झरर प्रसन्न तेरदाळकर यांनी केले. यावेळी सर्व श्री.कुशल सामाणी, नितीन वाडीकर, बाबासो कोंडेकर, हर्षद दलाल, सोहन शिरगावकर, जयदिप मांगोरे, मोहन कुशिरे, राहूल पाटील, एम.वाय.पाटील, हिंदूराव कामते, सुरेश मंडलीक, अशोकराव जाधव, सुशिल हंजे, सविता पाटील, सचिन शिरगावकर, डॉ.ए.एम.गुरव, सर्जेराव पाटील-सातारा, शामसंुदर देशिंगकर, संगीता नलवडे, ओंकार पोळ, अजिंक्य पाटील, जितेंद्र बामणे, दिपेन सबनिस, विशाल दिघे,विकास जगताप इ.उपस्थित होते. महत्वाचे मुद्दे. कोल्हापूरच्या उत्पादनाची माहिती महापोर्टलवर प्रसिध्द करणार. लेटर ऑफ क्रेडीटचे नियम वाचून सहया करा. परदेशात व्यापर करताना कसा करू नये याचा अभ्यास करा. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट चे सभासद व्हा. एखादा नगही तुम्ही या पोर्टलव्दारे निर्यात करू शकता.

Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur