विज दरवाढ कमी होवू दे - आमदार सतेज पाटील वाढलेले विजदर कमी होवू देत अशी प्रार्थना आमदार सतेज पाटील यांनी आपल्या असोसिएशनमध्ये बसविलेल्या श्री.गणेश चरणी केली. त्यांच्या हस्ते आज श्रीं.ची आरती संपन्न झाली. आरती नंतर झालेल्या चर्चेत शेतीसाठी विज ग्राहकांना मिटर बसवावेत, शासन 7000 कोटी अनुदान यासाठी देते. विज मिटर बसविल्यास ही रक्कम कमी होवून 4000 कोटीवर येईल असे म्हणाले. सध्या मुखमंत्री आणि उर्जामंत्री हे स्वतः देवेंद्र फडणवीस असल्याने त्यांना ते शक्य आहे. तसेच 2047 पर्यंत विकसित महाराष्ट् होण्यासाठीचे मुद्दे कोल्हापूरच्या मा.जिल्हाधिका-यांना पत्राव्दारे कळविणार आहे, तसेच ते औद्योगिक संघटनांकडूनही प्रस्ताव मागविणार आहेत. कोल्हापूरात मोठा उद्योग येणे, कुशल मनुष्यबळ मिळणे, कोल्हापूर, सांगली,सातारा हा औद्योगिक हब करणे, कोल्हापूर पुणे रोड चांगला करणे इ. विषयावर चर्चा केली. यावेळी सर्वश्री. अध्यक्ष-कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, सेक्रेटरी-कुशल सामाणी, टे्झरर-प्रसन्न तेरदाळकर, संचालक संजय अंगडी, दिनेश बुधले, बाबासोा कोंडेकर, अतुल आरवाडे, हर्षद दलाल, अभिषेक सावेकर, सुधाकर सुतार, प्रकाश चरणे, चंद्रकांत चोरगे, जयदिप मांगोरे, किरण वसा, देवेंद्र ओबेरॉय, सुरेश मंडलिक, अशोकराव जाधव,सुभाष चव्हाण,शितल दुग्गे,नंदकुमार नलवडे,विश्वजित सावंत,ओंकार पोळ, केडीसीसी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम.शिंदे,प्रदीप व्हरांबळे,प्रशांत मोरे इ.उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur