उद्योग विकास व समस्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससोा यांचेसोबत उद्योजकांची बैठक घेणार-आमदार अमल महाडिक.
 रस्ते दुरूस्तीसाठी निधी आहे, टेंडर झाली आहेत, पावसाळा संपल्यानंतर रस्ते दुरूस्ती केली जाणार आहेत. त्याच बरोबर औद्योगिक विकासासाठी आणि समस्या संदर्भात मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांचेसोबत उद्योजकांची सप्टेंबर 2025 मध्ये बैठक घेणार असल्याचे आमदार महाडिक म्हणाले. आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथील गणेशाची आरती संपन्न झाली. आरती नंतर झालेल्या चर्चेत आमदार महाडिक बोलत होते. थेट पाईप लाईन, ट्ॅफिकच्या समस्या, फौंड्ी उद्योग, फूड इंडस्ट्ीज, शुगर इंडस्ट्ीज, इ.उद्योगांचा विकास आणि समस्या याबाबत या बैठकीत चर्चा करू. कोल्हापूरच्या विकासासाठी 1000 बेडचे रूग्नालय, कॅन्सर हॉस्पीटल, कन्व्हेशन सेंटर , विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल इ. सुविधा लवकरच कोल्हापूर होणार आहेत. आयटीआयची संख्या वाढविणे, फौंड्ी कोर्ससाठी शिक्षक नेमणे, मशिनरी देवू इ.बाबत लवकरच मार्ग काढू असे म्हणाले. या समस्या तसेच मोठा उद्योग कोल्हापूरात आणणेसाठी उद्योगमंत्री ना.श्री.उदय सामंत यांच्याशी लवकरच चर्चाकरून याबाबतीतही एक बैठक घेवू असे मा.आमदार श्री.अमल महाडिक म्हणाले. त्याच बरोबर युवा पिढी उच्चशिक्षित झाली आहे परंतु त्यांना मानसिकदृष्टया सक्षम करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान जसे वाढले तसे युवा पिढीवर मानसिक ताण असल्याचे जाणवत आहे असेही ते म्हणाले. आमदार महाडिक यांचा असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्या हस्ते गणपतीची चांदीची फोटो फ्रेम देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व श्री.श्रीकांत दुधाणे, प्रसन्न तेरदाळकर, संजय अंगडी, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, सचिन मेनन, बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, प्रकाश चरणे, हिंदूराव कामते, सुरेश मंडलिक, अशोकराव जाधव,संजय पेंडसे, देवेंद्र ओबेरॉय,सुभाष चव्हाण, मुबारक शेख, सुधाकर सुतार, विश्वजीत सावंत, ओंकार पोळ,प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे,सुभाष जगदाळे इ.उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur