विज दरकमी करण्यासाठी प्रयत्नशिल,मित्रा संस्थेसोबत बैठक घेणार-आमदार राजेश क्षिरसागर
कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी शासन स्थरावर प्रयत्नशिल आहोत, कन्व्हेशन सेंटर, शक्तीपीठ महामार्ग, आयटी पार्क, श्री.अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास, पूर परिस्थिती कमी करण्यासाठी निती आयोगाच्या सहयाने तीन प्रकल्प राबविले जाणारे आहेत आणि महत्वाचे म्हणजे औद्योगिक वीजदर कमी करण्यासाठी मित्र या संस्थेसोबत पुढील महिन्यात दि.3 सप्टेंबर रोजी बैठक घेणार असल्याचे आमदार राजेश क्षिरसागर म्हणाले ते कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथील गणेशाची आरती त्यांच्या हस्ते करण्यात आली या निमित्त आले होते. हद्दवाढ करण्यासाठी लवकरच निर्णय जाहीर होईल, तसेच उच्च न्यायालयासाठी 27 एकर जागा दिली आहे. तसेच तिरूपती येथे महाराष्ट् भवन करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आसल्याचे ते म्हणाले. कोल्हापूरात मोठा उद्योग येण्यासाठी आंम्ही प्रयत्नशिल आहोत यासाठी एक बैठक लवकरच घेवू असेही ते म्हणाले. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पाणी टंचाई लवकरच दूर करण्यासाठी काम सुरू आहे, टॅ्फिकची समस्याही मोठी असून त्याबाबतही उपयायोजना करिता आहोत. सॅटर्डे क्लब तर्फे सर्वोत्कृष्ट सभासद-उद्योजक म्हणून पुरस्कार मिळालेबद्दल आमदार क्षिरसागर यांच्याहस्ते श्री.विशाल मंडलिक मे.यामा इंजिनिअर्स अॅण्ड टेस्टींग इक्वीपमेंटस् प्रा.लि. यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्याहस्ते आमदार क्षिरसागर यांचा गणपतीची चांदीची फोटोफ्रेम देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वश्री.कुशल सामाणी, प्रसन्न तेरदाळकर, संजय अंगडी, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, सचिन मेनन, बाबासोा कोंडेकर, अमर करांडे, प्रकाश चरणे, अशोकराव जाधव, सुरेश मंडलिक, विशाल मंडलीक, सुभाष चव्हाण, शांताराम सुर्वे, सुधाकर सुतार, विश्वजीत सावंत, प्रदीपभाई कापडिया, देवेंद्र खराडे, आशिष जाधव, अभिजीत नवाळे,अर्थव दुधाणे, संजय तोरस्कर,प्रदीप व्हरांबळे,प्रशांत मोरे इ.उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur