काल सायंकाळची आरती गणेश आरती उद्यमवार्ता जाहीरातदारांच्या हस्ते करण्यात आली. आपल्या असोसिएशन तर्फे दर पंधरा दिवसाला कोल्हापूर उद्यमवार्ता हे पाक्षिक प्रसिध्द केले जाते. या उद्यमवार्तामध्ये विविध उद्योजक,सभासद, इतर जाहीरातदार जाहीरात देत असतात. आजची गणेश आरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली. मुख्य संपादक श्री.नितीन वाडीकर यांनी उद्यमवार्ता थोडक्यात आजपर्यंतचा प्रवास सांगितला. अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णीसोा यांनी उद्योजक सभासद व जाहीरातदार हे उद्यमवार्ता आर्थिकबाबतीत स्वयंपूर्ण केले आहे याबद्दल जाहीरातदारांचे आभार मानले व असे सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच असोसिएशनतर्फे विविध कार्यक्रम व चर्चासत्रे सेमिनार आयोजित केले जातात यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी सर्वश्री प्रसन्न तेरदाळकर, बाबासोा कोंडेकर,के रवी कुमार- केलसन ग्रुप, सागर जाधव - फॅग कंट्रोल, रोहन तोडकर- सुशीतो इंटरप्राईजेस, विश्वजीत सावंत - सावंत ऍग्रो, रुपेश जाधव - नवभारत इनग्रेविंग, सात्तापा पाटील - एस पी ट्रेडर्स, अमोल सावंत - विजय आनंद स्प्रिंग वर्क्स , अंजुम तांबोळी, महेश चौगुले, इरफान कलावंत, वसीम तांबोळी -मिरर प्रिंटिंग प्रेस, स्वप्निल पाटील - टाटा स्ट्राईव्ह, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, प्रविण कोठावळे, राम कंुभार, भगवान माने इ.उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur