78 वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची 78 वी वार्षिक सभा खेळीमेळीत आणि उत्साहात संपन्न झाली. अजेंडावरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी मनोगतामध्ये म्हणाले सध्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळत नाही, यासाठी आयटीआयव्दारे देण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्टोअर किपर, सक्सेशन प्लॅनिंग, फौंड्ी कोर्स, लॅब टेक्नीशियन, पॅटर्न मेकिंग, एआय इ. विषयावर टे्निंग प्रोग्रॅम आयोजित करून कुशल मनुष्यबळ मिळणेसाठी प्रयत्न केला जाणार आहे. शिवाजी उद्यमनगर स्थापन होवून 78 वर्षे पुर्ण झाली परंतु याचे नाव कुठेही दिसत नाही, त्यामुळे शिवाजी उद्यमनगर येथील दोन ठिकाणी शिवाजी उद्यमनगर स्थापनेचा जाहीर नाम्याच्या कोणशिला बसविण्यात येणार आहेत. तसेच असोसिएशनची इमारत जुनी झाली आहे, वारंवार देखभाल करावी लागते व खर्चीकही आहे. या संपूर्ण जागेचा एक मास्टर प्लॅनकरून बांधकाम करण्याचे नियोजीत आहे. यासही सभासदांनी मंजूरी दिली.
माजी अध्यक्ष बाबासो कोंडेकर यांनी सन 2024-25 या कार्यकालातील कामगिरीचा आढावा सादर केला व सभासदांनी, संचालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
उपाध्यक्ष दुधाणेसो म्हणाले कोल्हापूर-बेळगाव मधील औद्योगिक विकासासाठी औद्योगिक विचारांची, तंत्रज्ञानाची देवाण घेवाण करणे, समस्या बाबत चर्चा करणेसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर गेल्या कांही दिवसापांसून सुरू असलेल्या अतिवृष्टीने मराठवाडयात शेतीचे, मालमत्तेचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे यांना मदतीचा हात देण्यासाठी असोसिएशन तर्फे शासनास निधी देण्यास सभासदांनी मंजूरी द्यावी असा प्रस्ताव मांडला आणि यास मंजूरी देण्यात आली.
संचालक नितीन वाडीकर यांनी असोसिएशनचा सामाणी हॉलची दुरूस्ती करित आहोत, याचे नुतनीकरण लवकरच पुर्ण होत आहे, त्याच बरोबर बुधले हॉलही सुशोभित करित आहोत याबाबतची माहिती दिली. सागर जाधव यांनी असोसिएशनचे कार्यक्रम चांगले असतात याबाबतची माहिती व्हीडीओव्दारे द्यावी अशी विनंती केली. ट्ेझरर प्रसन्न तेरदाळकर यांनी सभासदांनी सर्व विषयास मंजूरी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले व आजीव सभासद व्हावे असे आवाहन केले, त्याच बरोबर हॉल कार्यक्रमासाठी उपयोग करावा असे आवाहन केले.
स्क्वॉड्न लिडर निखिल महागावकर यांनी नुकत्याच झालेल्या भारत पाक युध्दात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल व त्यांच्या शौर्यासाठी, धाडसासाठी त्यांचा शालश्रीफळ व चांदीचे फोटोफ्रेम देवून सत्कार करण्यात आला. हा सत्कार सभासद सौ.वृषाली कुलकर्णी यांनी स्विकारला, यांचे ते जावई आहेत.
सभासद वृषाली कुलकर्णी यांनी आयटीआयकडे कुशल विद्यार्थी मिळणेसाठी प्रयत्न करावा असा मुद्दा मांडला, दिपक मिरजे यांनी शिवाजी उद्यमनगरचा एफएसआय वाढवून मिळावी अशी मागणी केली. विशाल मंडलीक यांनी असोसिएशन चांगले काम करित असून सभासदांनी अॅक्टीव्ह पणे सहभागी व्हावे असे आवाहन केले.
आभार प्रदर्शन सेक्रेटरी श्री.कुशल सामाणी यांनी केले. सूत्रसंचालन सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी केले.
यावेळी सर्व श्री.कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे, कुशल सामाणी, प्रसन्न तेरदाळकर, अतुल आरवाडे, बाबासो कोंडेकर, संजय अंगडी, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, हर्षद दलाल, अभिषेक सावेकर, अमर करांडे, हिंदूराव कामते, देवेंद्र ओबेरॉय, सौ.वृषाली कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी, संजय पेंडसे, अशोकराव जाधव, सुरेश मंडलीक, चंद्रकांत ओतारी,दिपक मिरजे, आय.आय.गडवाले, शाम देशिंगकर, महेंद्र जोशिलकर, सागर जाधव, प्रभाकर घाटगे, दिलीप निकम, दिलीप चव्हाण, थोंडिराम गवळी, रोहन अंगडी, बाळासाहेब चोपदार इ.उपस्थित होते.