Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
नुतनीकरण केलेल्या शेठ रामभाई सामाणी हॉलचे आणि सिडबी बॅंक प्रोमोसेंटरचे उद्घाटन संपन्न. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचा नुतनीकरण केलेल्या शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉलचे उद्घाटन आणि श्री.रामप्रताप झंवर हॉलमधील स्व.श्री.रामप्रताप झंवर यांच्या फोटोचे अनावरण मे.झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्जिचे चेअरमन व कार्यकारी संचालक श्री.नरेंद्र झंवर यांच्या हस्ते करण्यात आले, तर उद्योजक सभासदांच्या सोईसाठी असोसिएशनमध्ये सुरू केलेल्या सिडबी बॅंक प्रोमो सेंटरचे उद्घाटन सिडबी बॅंकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री.मनोज डिंग्रा यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून श्री.झंवर हॉल आणि श्री.सामाणी हॉल असोसिएशनच्या विविध उपक्रमांचे साक्षीदार आहेत. हे दोन्ही हॉल इतर लोकांनाही भाडेतत्वावर दिला जातो. सर्व प्रथम स्व.रामप्रताप झंवर यांच्या फोटोचे अनावर त्यानंतर नुतनीकरण केलेल्या शेठ रामभाई सामाणी हॉलचे उद्घाटन आणि त्यानंतर सिडबी बॅंक प्रोमोसेंटरचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले यामध्ये म्हणाले.... यापुर्वी सन 2009 साली फौंड्ीक्लस्टरच्या माध्यमातून नुतनीकरण नियोजन आयोगाचे सदस्य श्री.नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाल्याचा उल्लेख केला. स्वर्गीय रामप्रताप झंवर यांच्या प्रतिमेचे अनावरण हा एक असोसिएशनच्या दृष्टीने एक महत्वाचा व अभिमानाचा क्षण आहे. संचालक श्री.सचिन मेनन यांनी हा विषय मांडला व त्याची अंमलबजावणी करण्यात आली. स्व.झंवरसोा यांच्या असोसिएशनमधील 1975 साला पासूनचा आढावा सांगितला. असोसिएशनच्या आर्थिक उन्नतीमध्ये महत्वाची भूमिका त्यांनी घेतली होती. या काळात मला टे्झरर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. फौंड्ी क्लस्टर स्थापनाही स्व.झंवरसाहेबांनी केली. स्व.झंवरसाहेब म्हणायचे व्यवसाय करत असतांना प्रत्येक क्षण सावधपणे व आनंदाने जगायचा, जो सावध तो सुखी आणि जो सुखी तो यशस्वी. तसेच व्यवसाय हा अडचणीतच चालवायचा असतो इतर वेळी तो चालतच असतो. स्व.रामप्रताप झंवर यांची प्रतिमा सतत प्रेरणा देत राहील सिडबी बॅंकेचे प्रोमो सेंटर असोसिएशनमध्ये सुरू झाले आहे याचा लाभ उद्योजक सभासदांनी घ्यावा. सामाणी परिवारांतर्फे रू.1,51,000/- ची देणगी देण्याचा मनोदय श्री.नयन आणि श्री.कुशल सामाणी यांनी व्यक्त केलेची माहिती दिली तसेच हा चेक त्यांनी टे्झरर श्री.प्रसन्न तेरदाळकर यांच्याकडे सुपुर्द केला याबद्दल सर्वांनी त्यांचे टाळया वाजवून अभिनंदन केले. उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांनी सिडबी बॅंकेबाबत म्हणाले कि या बॅंकेचे व्याजदर कमी आहेत, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सन 2005 रोजी त्यांनी सिडबीकडून सेवा घेतली होती. यानंतर सिबडी बॅंकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणाले येथील प्रोमो सेंटरमुळे उद्योजकांना चांगली सुविधा मिळणार आहे. सपोर्ट सिस्टिम, हार्ड इंटरव्हेशन तसेच सिडबी बॅंक आणि उद्योजकांमधील ब्रीज आहे, उद्योजकांना सर्व प्रकारच्या सुविधा ऑन लाईन उपलब्ध आहेत. एखादा उद्योग नुकसानीत असेल आणि त्याचा कॅश प्रॉफिट चांगला असेल अश्या परिस्थितीत सिडबी बॅंक त्यांचा मदत करू शकते. याचा लाभ घ्यावा. यानंतर प्रमुख पाहुणे नरेंद्र झंवर म्हणाले स्व.झंवर साहेब हे शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे होते, आम्हाला शिक्षण घेत असतानाचा दररोज कांही वेळ मशिनवर काम करायला सांगायचे. दररोजच्या कामाचा रिपोर्ट ते मागायचे, याचा फायदा मला झाला, त्यानंतर नविन पिढीमधील त्यांचे नातू, नात सूना यांनाही झाला असून ते आता उत्तम प्रकारे उद्योग चालवित आहेत यापेक्षा काय पाहिजे. आम्हाला त्यांनी घडविले ही आमच्यासाठी साहेबांची देणगी आहे. यापुर्वी प्रमुख पाहुणे नरेंद्र झंवर यांचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, निरज झंवर यांचे उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, मनोज डिंग्रा यांचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, माजी आमदार जयश्री जाधव यांचे उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्याच बरोबर हॉलची अंतर्गत उत्कृष्ट सजावट केलेबद्दल आर्किटेक्ट सचिन गायकवाड यांचे प्रमुख पाहुणे नरेंद्र झंवर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. आभार प्रदर्शन टे्झरर प्रसन्न तेरदाळकर यांनी केले, सूत्रसंचालन सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी केले. यावेळी सर्वश्री.कुशल सामाणी, संजय अंगडी, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, सचिन मेनन, बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, हर्षद दलाल, अभिषेक सावेकर, जयदीप मांगोरे, नयन सामाणी, जयदिप चौगुले, सुरेंद्र जैन, प्रकाश चरणे, सुधाकर सुतार, जयदिप चौगुले, सुनिल शेळके, संजय देशिंगे, मोहन कुशिरे, अमृतराव यादव, हरिशचंद्र धोत्रे, सतिश कडूकर, संजय शेटे, आनंद माने, सुभाष माने, चंद्रकांत चोरगे, देवेंद्र ओबेरॉय, विज्ञान मुंडे, अजित कोठारी, सुशिल हंजे, एैश्वर्या जाधव-सिडबी बॅंक, अभय पंडितराव विरेंद्र पाटील, सुभाष चव्हाण, विश्वजीत सावंत, सचिन गायकवाड,श्रुती कुलकर्णी, प्रदीप व्हरांबळे,प्रशांत मोरे इ.उपस्थित होते.
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur