कोण म्हणतो पैसे सोन्यात गंुतवा, कोण म्हणतो शेअर्समध्ये गंुतववा असे न करता आणि कर्ज न घेता उद्योग सुरू करा, वाढवा, उद्योग विकासाचे नियोजनकरूनच उद्योग करा असे प्रतिपादन चेअरमन व कार्यकारी संचालक मे.कूपर कार्पोरेशन प्रा.लि.,सातारा यांनी केले ते कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन तर्फे देण्यात येणारे उद्योगश्री आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्र्रमुख पाहुणे सक्सेस स्टोरी ऑफ कूपर इंडस्ट्रिज या विषयावर ते बोलत होते. त्यांच्याहस्ते मे.सुनिल इंडस्ट्रिजच्या विद्या सुनिल माने, मे.मिराशा शेपर्स प्रा.लि.,चे स्वर्गीय रणजीत रूपचंद शाह, मे.महाराष्ट्र इंजिनिअर्सचे नितीन मोहन वाडीकर यांना उद्योगश्री तर मे.ब्राईट स्टिल इंजिनिअर्सचे स्वर्गीय नारायण आत्माराम उर्फ नाना तेंडुलकर यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. स्वर्गीय रणजीत शाह यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी सिमा शाह यांनी तरे नाना तेंडुलकर यांचा सत्कार त्यांचे चिरंजीव रविंद्र तेंडूलकर यांनी स्विकारला. शाल,श्रीफळ,स्मृती चिन्ह,मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ उद्योजक नंदकुमार नलवडे, मुबारक शेख, पुरस्कार प्राप्त उद्योजक संजय पेंडसे व दिलावर शेख यांचा शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. एआय सारखे तंत्रज्ञान अद्यायावत आहे, प्रत्येक गोष्टीत कांहीतरी कमतरता असते याप्रमाणे एआयमध्येही कांही दोष असतील परंतु त्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात करा. एआय तंत्रज्ञानाला खूपमोठया संधी आहेत. आमच्या कारखान्यात 100 रोबोट 24 तास कामकरित आहेत. कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. आमच्याकडे 400 कामगार गेल्या 40 वर्षापासून कामकरित आहेत. Right person to Right Job याची अंमलबजावणी करा. आमच्या कंपनीने साता-याबसून जर्मनीमधील मशिन ऑपरेटकरून दाखविली आहेत. दरवर्षी 1500 इंजिन्स डिफेन्सला जातात. जुन्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले उद्योजक बापूसो जाधव यांची आठवण काढून ते म्हणाले कारखान्याच्या सुरवातील आंम्ही बापूसोा जाधव यांची भेट घेवून माहिती घेतली व कांही पार्टची त्यांच्याकडे आंम्ही ऑर्डर दिली होती. कोल्हापूरची इंडस्ट् िखूप मोठी आहे, अनेक नामवंत उद्योजक होवून गेले आहेत व त्यांची पुढील पिढी मोठया उत्साहाने काम करित आहेत त्यांचा आदर्श घ्या असे नव उद्योजकां उद्देशून ते म्हणाले. दैनंदिन जिवनात स्वतःचे आरोग्य सांभाळावे यापेक्षा कांही मोठे नाही. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी प्रास्तावीकात म्हणाले असोसिएशनला 78 वर्षाचा औद्योगिक विकासाचा इतिहास आहे, अनेक नामवंत उद्योजकांनी येथे उद्योगसुरू केले, त्यांच्या औद्योगिक कार्यामुळे कोल्हापूरची ओळख उद्योगनगरी म्हणून झाली व जगभर वाढविली. यापैकी गुणी उद्योजकांचा असोसिएशन तर्फे उद्योगश्री व जीवनगौरव पुरस्कार देवून सत्कार करण्याची असोसिएशनची गेल्या 13 वर्षाची परंपर आहे त्यांचा आज या ठिकाणी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करणार आहोत, तर ज्येष्ठ उद्योजकांचाही या ठिकाणी सत्कार करणार असल्याचे ते म्हणाले. प्रमुख पाहुण्याची ओळख उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्याचा शाल,श्रीफळ, श्री.अंबाबाईची मुर्ती फोटो फ्रेम,पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देवून अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. आभारप्रदर्शन टेªझरर प्रसन्न तेरदाळकर यांनी केले तर सूत्र संचालन क्षितीजा ताशी व प्रदीप व्हरांबळे यांनी केले यावेळी कुशल सामाणी,संजय अंगडी,नितीन वाडीकर, सचिन मेनन, बाबासोा कोंडेकर, हर्षद दलाल, अमर करांडे, अभिषेक सावेकर, जयदिप मांगोरे, जयदिप चौगुले, सुनिल शेळके, माजी आमदार जयश्री जाधव, मोहन कुशिरे, राहूल पाटील, दिपक चोरगे, सारंग जाधव, सुरेंन्द्र जैन, साजिद हुदली, सचिन शिरगावकर, भरत जाधव, दिपक जाधव, प्रकाश चरणे, आर.बी.थोरात, प्रदीपभाई कापडिया,राजू पाटील, हिंदूराव कामते, सतिश कडूकर,आनंद पेंडसे, संजय देशिंगे, विरेंद्र पाटील, डॉ.ए.एम.गुरव, नलीनी नेने, देवेंद्र दिवाण,संगीता नलवडे इ.उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur