महापालिकेच्या कार्यप्रणालीबाबत जागृत व्हा-ॲड.शहाजी सावंत.
असोसिएशन तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

          भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रमा आयोजित केला होता.  अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
          या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.शहाजी सावंत हे उपस्थित होते, त्यांनी महापालिकेची कार्यपध्दती आणि नागरिकांनी आपले प्रश्न कसे सोडवावेत याबाबत उपस्थितस्तांना मार्गदर्शन केले.
          श्री.सावंत म्हणाले स्वातंत्र्यनंतरही आजही लोकांना घटनेबाबत जागृत करावे लागते ही मोठी खंत आहेत.  रत्यावरील सायकल दुरूस्त करणा-या माणसाला जर विचारले की महापालिकेची पूर्ण माहिती आहे की, तर तो उत्तर देवू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. महापालिकेची कार्यप्रणाली,कायदयातील तरतूदी,शहरातील नागरिकांनी आपले कामे कशी झाली पाहिजेत किंवा कश्या पध्दतीने करून घेतली पाहिजेत याबाबत फारशी माहिती नाही, आणि जी माहिती आहे ती थोडशी चुकीची आहे.  कोल्हापूर हे सेल्फ गर्व्हमेंट आहे. कोल्हापूरचे वेगळे असे शासन आहे, तुम्ही राजे आहात. महापालिकेचे पीडब्यूडी, आरोग्य आणि जनरल असे ती विभागात काम चालते. जनतेला हे माहिती नाही की,रस्ता खराब झाला आणि तो दुरूस्ती करण्यासाठी नगरसेवकांकडे जातात हे चुकीचे आहे, रस्ते दुरूस्तीसाठी महापालिकेचे विविध अधिकारी नेमलेले असतात त्यांच्याकडे जो रस्ता दुरूस्ती करावयाचा आहे त्याची पुर्ण माहिती महापालिकेकडून मागवून घ्या आणि हा रस्ता दुरूस्तीची करण्याची लेखी मागणी करा.  सध्या आधूनिक कॉम्प्युटर ऑनलाईन सिस्टिम असल्यामुळे जन्म-मृत्यूचा दाखला मिळण्यासाठी सहा दिवसापेक्षा जास्त वेळ लागता कामा नये. घरफाळा हा इमारतीच्या मूल्यांकनावर आकारला जातो.  घरफाळा हा घरभाडयावर आकारला जात  नाही. यासाठी नागरिकांनी घरफाळा बिले निट व्यवस्थीत वाचावीत त्याचा अभ्यास करावा. नागरिकांच्या अज्ञान पणाचा फायदा कांही भ्रष्ट कर्मचारी व अधिकारी घेतात व यांच्यामुळे नागरिंकांची कामे होत नाहीत. इमारत बांधकाम परवाना मिळणे अशी महत्वाची कामे असतात त्यासाठी नियमावली आहे याबाबत जागृत राहून काम करा.  महापालिकेकडे कोणतीही मागणी करताना तोंडी,प्रत्यक्ष भेटून सांगणे यापेक्षा लेखी मागणी करावी त्याची पोच घ्यावी हे अत्यंत महत्वाचे आहे.  आपण दिलेल्या लेखी पत्राची माहिती महापालिकेला ठेवावीच लागते आणि या पत्रावर आजपर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती मिळू शकते हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.  सर्वांनी आणि असोसिएशनी महापालिकेच्या नियमावलीची माहिती पुस्तीका असते ते ठेवावी त्याचा अभ्यास करावा असे त्यांनी आवाहन केले.  यानंतर उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे ॲड.सावंत यांनी दिली.
           कार्यक्रमाच्या सुरवातील अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी प्रस्तावीक व मनोगत केले यामध्ये त्यांनी भारतीय प्रजास्ताक दिनाबाबतची माहिती थोडक्यात सांगितली, ते म्हणाले फाळणी नंतर संवीधान सभेच्या सदस्यांची संख्या 299 इतकी झाली यामध्ये 229 प्रांतांचे प्रतिनिधी होते तर 70 प्रतिनीधी हे संस्थानिकांचे होते. सर बी.एन.राव हे संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मूलभूत सल्लागार समिती होती.  22 समित्यांच्या प्राप्त शिफारशीवर आधारित संविधानाचा मसुदा डॉ.बाबासो आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने तयार केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी घटना तयार केली ते घटना मुसदा समितीने अध्यक्ष होते. घटना सभेची स्थापना 9 डिसेंबर1946 झाली, 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकारली आणि 26 जानेवारी 1950 रोजी घटना अंमलात आणली. संविधान तयार होण्यास 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागली. भारताचे मूळ संविधान हाताने लिहीलेने आहे. प्रेम बिहारी नारायण रायझादा यांच्या सुंद हस्ताक्षरामध्ये आहे. संविधानावर कोणतीही सही नाही, पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी फक्त घटना सदस्यांची सहया आहेत. कॉंग्रेसने 26 जानेवारी 1930 रोजी पुर्णस्वराज्य घोषीत केले म्हणून 26 जानेवारी या दिवसाची खास निवड केली होती. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीन संविधान आहे.  संवीधानात सुरवातीला  365 कलमे होती आज यामध्ये वाढ झाली आहे.  यानंतर सर्व उद्योजक सभासद आणि उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  अॅड.सावंत यांचा प्रदीपभाई कापडिया आणि ॲड.अशोकराव उपाध्ये यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.  यानंतर कोल्हापूर उद्यमवार्ताच्या 26 जानेवारी च्या विशेषांकाचे प्रकाशन अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.  मुख्यसंपादक नितीन वाडीकर यांनी या अंकाबाबतची माहिती दिली.  
           या कार्यक्रमास सर्वश्री कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे,संजय अंगडी, नितीन वाडीकर,अतुल आरवाडे, अमर करांडे, ॲड.अशोकराव उपाध्ये, प्रदीपभाई कापडिया, सुभाष चव्हाण, शाम देशिंगकर, संजय पाटील, हिंदूराव कामते,डॉ.ए.एम.गुरव, किरण वसा, देवेंद्र ओबेरॉय, प्रकाश चरणे, सुरेश मंडली, अशोकराव जाधव, नंदकुमार नलवडे, संदीप मांगोरे, निवास मिठारी, सुर्यकांत खोत, शैलेश पुरोहीत, विश्वजीत सावंत, दिलावर शेख, राजन रावळ, आनंद सावंत, आबुबकर शेख, आरिफ शेख,किरण गुरव, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, प्रविण कोठावळे, राम कुंभार, भगवान माने इ.उपस्थित होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur