माणसाला होणा-या आजाराबद्दल प्राथमिक माहिती फारशी नसते, ती प्रत्येकाने आजून घेणे आणि याबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत डॉ.चंद्रकांत परूळेकर-कक्ष प्रमुख मुख्यमंत्री सहायता निधी, जिल्हाधिकारी कार्यालय,कोल्हापूर यांनी केले ते कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन आणि अथायू हॉस्पीटल,कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीराप्रसंगी बोलत होते, त्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून या शिबीराची सुरवात करण्यात आली.
आर्थिक दुर्बल घटकांना म्हणजेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न रूपये एक लाख साठ हजारच्या आत आहे त्यांच्यासाठी शासनच्या 23 विविध आजारावरील वैद्यकिय उपचारासाठी शासना तर्फे आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून केली जाते. लहानमुले, ब्रेन सर्जरी, ट्रान्सप्लांट सर्जरी तसेच जी.बी.सिंड्रोम सारख्या आजारासाठीही मदत केली जाते. शासनाच्या अनेक योजना आहेत परंतु जनतेमध्ये याची फारशी माहिती नाही त्यामुळे याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
क्राउड फंडिग (सोशल मिडीया प्लॅटफॉर्म) असा एक मार्ग आहे ज्याव्दारे गरजू लोकांना पाहिजे असलेल्या मदतीची माहिती दिली जाते आणि याव्दारेही वैद्यकिय उपचारासाठी मदत मिळू शकते. तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी होणा-या खर्चावर नियंत्रण रहावे यासाठी कॅपिंग लावले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. वरील सर्व कार्य वॉररूम सारखे आमचा विभाग कार्य करित आहे असेही ते म्हणाले.
आजच्या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये बीपी, शुगर,वजन, हार्ट रेट, पोट दुखी, गुडघा,हातपात, मणका दुखी, त्वच्या रोग इ.ची तपासणी करून आरोग्य विषयी सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. या शिबीरामध्ये उद्योजक,सभासद, कर्मचारी त्यांचे परिवारातील सदस्य,महिला कर्मचारी यांचा सहभाग होता. अथायू हॉस्पीटलचा स्टाफ यामध्ये डॉ.दिप्ती देशमुख, डॉ.सानिया, डॉ.निकिता, जनरल मॅनेजर दामोदर घोलकर, अनिल फले, स्नेहल आपटे, नर्सिंग, पॅथॉलॉजी स्टाफ, ईसीजी टेक्नीशियन इ.चे चांगले सहकार्या लाभले. या आरोग्य शिबीराचा 40 जणांनी लाभ घेतला.
याशिबरास सर्व अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी,उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे, सेक्रेटरी कुशल सामाणी, टेªझरर प्रसन्न तेरदाळकर, संचालक संजय अंगडी, नितीन वाडीकर, सचिन मेनन, बाबासोा कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे,भालचंद्र कुलकर्णी, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, प्रवीण कोठावळे, राम कुंभार, भगवान माने इ.उपस्थित होते.