Shivaji Udyam Nagar,
Kolhapur, Maharashtra
कर्मचारी राज्य बिमा निगम यांचे कोल्हापूर येथील कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सभा आयोजित केली होती. ईएसआयसी मार्फत औद्योगिक कर्मचा-यांना विविध औद्योगिक सुविधा देण्यासाठी सेवा रूग्नालये आहेत. यामध्ये कांही समस्या असून व कर्मचारी व त्यांच्या कुटंुबियांना अधिक सुविधा मिळण्यासाठी इंजिनिअरिंग असोसिएशन तर्फे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी खालील प्रमाणे समस्या व प्रश्न मांडून चर्चा केली.
1. दर रविवारी अर्धा दिवस सेवा रूग्नालय सुरू ठेवणे. कोल्हापूरातील औद्योगिक क्षेत्र हे रविवार सुरू असते, त्यामुळे आपतकालीन स्थितीत रूग्नांना वेळेत उपचार मिळणेसाठी रविवारी अर्धादिवस सेवा रूग्नालय सुरू ठेवावेत.
2. नविन नियमानुसार ईएसआयसीचा मोठा विस्तार झाला असून कर्मचारी आणि मालक हयांची संख्या वाढली आहे. यामुळे रूग्नांना वेळेत उपचार मिळणेसाठी सेवा रूग्नालयांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
3. रूग्नांचा व कर्मचा-यांचा त्रास कमी करणेसाठी रेफरल लेटर ऑन लाईन पध्दतीने संबंधीत रूग्नालयांना पाठविण्याची सुविधा करावी.
4. सेवा रूग्नालयात दंत तपासणी, त्वचा रोग तपासणी किंवा किडणी संदर्भातील तपासणीची सोय नाही कृपया ही सोय उपलब्ध करावी.
5. औद्योगिक प्रतिनिधी असलेल्या लोकल कमिटीच्या सभा गेल्या पाच वर्षापासून झालेल्या नाहीत. सदरची कमिटी पुन्हा निवड करून लोकल कमिटीच्या सभा आयोजित कराव्यात.
रविवारी सेवा रूग्नालय सुरू करणेबाबत प्रस्तावित आहे याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. एमआयडिसी एरिया सोडून शहरातील सेवा रूग्नालयांची वेळ सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत प्रस्तावीत आहे परंतु यासाठी सध्या असलेल्या रूग्नालयाची जागा बदलावी लागणार असून वाढीव स्टाफची आवश्यकता लागेल. रेफरल लेटर ऑन लाईन देण्याची व्यवस्था केंद्र शासनाच्या हॉस्पीटलमध्ये आहे परंतु महाराष्ट्र शासनाकडे नाही ती सुरू करणेबाबत याबाबत पाठपुरावा सुरू आहे. कोअर कमिटीची सभा घेणेबाबत प्रादेशिक अधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठविला असून लवकरच याची मंजूरी येईल व सभा होतील. दंत तपासणीची सोय सेवा रूग्नालयाकडे सध्यातरी नाही. कागल येथे सहा बेडचे रूग्नालय तसेच डायग्नोस्टिक सेंटर मंजूर झाले असून तेही लवकरच सुरू होईल अशी माहिती वैद्यकिय प्रशासन अधिकारी डॉ.मिलींद चौधरी, यांनी दिली.
या सभेस सर्वश्री अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, टेªझरर प्रसन्न तेरदाळकर, डॉ.सोमनाथ घोंगडे-प्रशासन अधिकारी सचिव प्रदीप व्हरांबळे, स्मॅक सचिव जितेंद्र बामणे, गोशिमा सचिव कृष्णात सावंत इ. उपस्थित होेते.
1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur